लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यवतमाळात २६ वी ज्युनियर राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत राज्यातल्या २८ जिल्ह्यामधून ४०० विद्यार्थी सहभागी झाले आहेत. या स्पर्धेत निवड झालेल्या स्पर्धकांना राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.यवतमाळ जिल्हा तलवारबाजी असोसिएशन आणि महाराष्ट्र तलवारबाजी असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक नेहरू स्टेडियमवर तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २८ ते ३० सप्टेंबरपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे. या स्पर्धेत २८ जिल्ह्यातून १९ वर्षाच्या आतील २५० मुले आणि १५० मुली सहभागी झाले आहेत. तर ५० पंच अधिकारी, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त १० संघटक नियुक्त करण्यात आले आहेत. रविवारी या स्पर्धेचा समारोप होणार आहे. या स्पर्धेत विजयी १२ स्पर्धकांना राष्ट्रीय क्रीडास्पर्धेत खेळता येणार आहे.तलवारबाजी संघटनेचे राज्याध्यक्ष प्रकाश काटुले, राज्य संघटना सचिव डॉ. उदय डोंगरे, भारतीय तलवारबाजी संघाचे निरीक्षक संघ कोषाध्यक्ष अशोक दुधारे, संघटनेचे जिल्हा सचिव प्रा. विकास टोने, नरेंद्र फुसे, महेश तरोणे, आशिष यवले, सुशील गजभिये, पीयूष चांदेकर यांच्यासह अनेक मंडळी स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी झटत आहेत.पोषक वातावरणतलवारबाजी हा अतिशय चपळाईचा खेळ असून जिल्ह्यात त्यासाठी पोषक वातावरण आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये या क्रीडा प्रकाराबाबत मोठा उत्साह आहे. या स्पर्धेमुळे पोषक वातावरण आहे.
तब्बल ४०० तलवारबाज यवतमाळात झुंजले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 9:12 PM
यवतमाळात २६ वी ज्युनियर राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत राज्यातल्या २८ जिल्ह्यामधून ४०० विद्यार्थी सहभागी झाले आहेत. या स्पर्धेत निवड झालेल्या स्पर्धकांना राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.
ठळक मुद्देराज्यस्तरीय स्पर्धा : दहा वर्षानंतर यशस्वी आयोजन