दगडफेकीचे प्रकरण : भीमशक्ती संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पुसद : परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथे भीम जयंती मिरवणुकीवर झालेल्या दगडफेकीचा निषेध करून या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी येथील भीमशक्ती संघटनेने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. पूर्णा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता समाजकंटकांनी या मिरवणुकीवर दगडफेक केली. त्यात महिलांसह अनेक जण जखमी झाले. ही घटना अशोभनीय असून, याप्रकरणी दोषी असणाऱ्यांवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली. सदर निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. या निवेदनावर भीमशक्ती संघटनेचे तालुकाध्यक्ष सूरज हाडसे, संजय इंगोले, रमेश गायकवाड, बंडू कांबळे, बाबाराव खंदारे, संतोष अंभोर, आनंद कांबळे, सुखदेव गायकवाड, युवराज बलखंडे, सचिन लोणे, अर्जुन हाटे, काशिनाथ लांडगे, अक्षय धुळे, अमर सावळे, विजय आवटे, माधव चिरंगे, शंकर साबळे, भीमराव हाटे, पुंडलिक भालेराव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)
पूर्णा येथील आरोपींना अटक करा
By admin | Published: April 19, 2017 1:29 AM