शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
3
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
4
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
5
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
6
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
7
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
8
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
9
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
12
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
13
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
17
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
18
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
19
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

उमरखेड दगडफेकीत संशयितांची धरपकड

By admin | Published: September 17, 2016 2:38 AM

गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक करणाऱ्या संशयितांची उमरखेड पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे.

महानिरीक्षक दाखल : अतिरिक्त पोलीस कुमक तैनात, विसर्जन आटोपले उमरखेड : गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक करणाऱ्या संशयितांची उमरखेड पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. आतापर्यंत ३५ जणांना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान गुरुवारच्या घटनेनंतर उमरखेडमधील सर्व प्रमुख सार्वजनिक गणेश मंडळाच्या मिरवणुका आणि गणेश विसर्जन शांततेत पार पडले. छावा गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीवर उमरखेडमधील ताजपुरा मार्गावर गुरुवारी सायंकाळी तुफान दगडफेक करण्यात आली होती. त्यात पाच पोलिसांसह १६ जण जखमी झाले. पोलिसांना हवेत गोळीबार करुन परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली होती. पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा प्रयत्न, शासकीय कामात हस्तक्षेप या सारखे गंभीर गुन्हे दाखल करून रात्रीपासूनच संशयितांची धरपकड सुरू केली होती. आतापर्यंत ३५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी पोफाळी, पुसद, महागाव, बिटरगाव, दिग्रस, दारव्हा, यवतमाळ तसेच शेजारील जिल्ह्यातून अतिरिक्त पोलीस कुमक मागविण्यात आली आहे. अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव, अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, राज्य गुप्तवार्ता विभागाच्या नागपूर येथील उपायुक्त अनिता पाटील आदी घटनास्थळी दाखल झाले आहेत. रात्री अज्ञात समाजकंटकांनी बसस्थानक आणि ढाणकी रोडवर दोन दुकानांची जाळपोळ केली. त्यात लाखोंचे नुकसान झाले. दगडफेक व जाळपोळीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी उमरखेडमधील बाजारपेठ, शाळा-महाविद्यालये दिवसभर बंद होती. या घटनेमुळे उमरखेडमधील जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र पहायला मिळाले. दरम्यान उमरखेड शहरातील अन्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुका सकाळी ११ वाजेपर्यंत नांदेड रोडवरील पैनगंगा नदीवर पोहोचल्या होत्या. तेथे सर्व मंडळांच्या श्रीगणेशाचे विसर्जन पार पडले. उमरखेडचे आमदार राजेंद्र नजरधने यांनी सुरुवातीला दगडफेक करणाऱ्यांची अटक झाल्याशिवाय एकही गणपती जाग्यावरुन हलणार नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे पोलिसांची कोंडी झाली. नंतर नजरधने यांनी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांची समजूत काढली व शांततेचे आवाहन केल्याने तणाव निवळला. शहरात मुख्य मार्गावर ठिकठिकाणी थांबलेल्या गणेश मंडळांच्या मिरवणुका पहाटे ३ वाजता आमदार नजरधने यांच्या मध्यस्थीने मार्गस्थ झाल्या. (शहर प्रतिनिधी) घटनास्थळी पोलिसांची तर रुग्णालयात डॉक्टरांची कमतरताउमरखेडमधील दगडफेकीच्या घटनेच्या निमित्ताने पोलीस आणि आरोग्य विभागातील मनुष्यबळाची कमतरताही उघड झाली. ज्या ताजनगर मार्गावर दगडफेक झाली तेथे पोलिसांची संख्या कमी होती. डीजेच्या तालावर गणेश भक्त थिरकत असताना अचानक दगडफेक सुरू झाली. त्यामुळे पोलिसांचाही गोंधळ उडाला. नेमके काय होत आहे आणि काय करावे हे कुणालाच समजेनासे झाले होते. शहरात या घटनेची वार्ता पसरताच अनेक गणेश मंडळांनी आपली मिरवणूक जागच्या जागीच थांबली. घटनास्थळी पोलिसांचे मनुष्यबळ कमी असल्याने परिस्थितीवर नियंत्रण मिळविताना उपलब्ध यंत्रणेला बरीच कसरत करावी लागली. या दगडफेकीत जखमींना शासकीय रुग्णालयात नेले असता तेथेही डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवली. त्यामुळे जखमींना काही वेळ उपचारासाठी प्रतीक्षा करावी लागली.