लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : सापाची तस्करी करणाºया तिघांना वनविभागाने अटक केली. त्यांच्या जवळून जीवंत साप जप्त करण्यात आला.दिगांबर देवराव कांबळे (४०), लखन गणेश मानकर (२३) रा.मांगुळ आणि अमोल राजू भगत (२५) रा. चांदापूर (भांब) अशी आरोपींची नावे आहे. काही व्यक्ती साप पकडून गुप्तधन काढणाºयांना विकत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. त्यावरून वनविभागाने जवळा येथील दिगांबर कांबळे यांच्या घरी धाड घातली. यात एका भरणीत दोन तोंड्या साप (मालन) आढळून आला. त्याची किंमत सहा ते सात लाख रुपये असल्याचे सांगितले जाते. ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी सी. एस. गावंडे, वनरक्षक ए. पी. श्रीनाथ, नीलेश चव्हाण, दीपक सपकाळे, जी. पी. जाधव, नितीन तांभारे, मारोती जाधव, शिवाजी पैनापल्ले, सदानंद होडगीर, एन.एम. कुरसंगे यांनी पार पाडली. आरोपींविरूद्ध भारतीय वन्यजीव कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.सुकळीत सागवान जप्तजवळा : सुकळी येथे शनिवारी धाड मारून वन विभागाने ५० हजारांचे सागवान जप्त केले. अवैध सागवान कटाई करून फर्निचर विक्री होत असल्याची माहिती वनरक्षक नीलेश चव्हाण यांना मिळाली. त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी सी.एस. गावंडे यांना माहिती दिली. यवतमाळचे फिरते पथक व आणी रेंजच्या वन पथकाने दत्ता मोरे यांच्या घरी धाड घालून सागवान जप्त केले. याप्रकरणी नंदू संजय मोरे (२४) याला अटक करण्यात आली. सहआरोपी दत्ता मोरे फरार झाला.
जवळा येथे सापाची तस्करी करणाºयांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 9:36 PM