लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लोकमत वृत्तपत्र समूह, साधू वासवानी मिशन पुणे, लायन्स क्लब कॉटन सिटी यवतमाळ व यवतमाळ केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कृत्रिम हात-पाय (जयपूर फूट) मूल्यांकन व वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिर यवतमाळ येथील दारव्हा रोडवरील पोलीस दक्षता भवन येथे होणार आहे.रविवारी २१ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत होणाऱ्या शिबिरात सहभागी लाभार्थ्यांचे तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व आवश्यकतेनुसार हात-पायांचे माप घेण्यात येणार आहे. शिबिरात तज्ज्ञ डॉक्टर तपासणीसह मार्गदर्शनही करतील. दीड महिन्यांच्या कालावधीनंतर लाभार्थ्यांना कृत्रिम हात-पायांचे वितरण करण्यात येईल.दुर्घटनेत हात-पाय गमावणारे, मधुमेहाने त्रस्त, रक्तवाहिनींच्या विकाराने पीडित व्यक्ती आणि गँगरीन झालेल्या व्यक्ती सर्वसामान्य जीवन जगण्यात असमर्थ असतात. अशा व्यक्ती कृत्रिम हात-पायांच्या सहाय्याने सामान्य जीवन जगू शकतात. सर्वसामान्यांप्रमाणे चालू फिरू शकतात. सर्व कामकाज करू शकतात. एवढेच नव्हेतर सायकल, रिक्षा चालवू शकतात. त्यांना पळता, खेळताही येते. तसेच नृत्यही करता येते. या शिबिरातून अपंग नागरिकांना सामान्य जीवन जगण्याची मदत तसेच उमेद मिळेल. जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या शिबिरात सहभाग नोंदवावा, असे आवाहन लायन्स क्लब कॉटन सिटीचे अध्यक्ष दिलीप नागवानी, सचिव रवी तलरेजा, प्रकल्प संचालक उमेश वाधवानी, यवतमाळ केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष पंकज नानवाणी, सचिव संजय बुरले, ‘लोकमत’ जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा आदींनी केले आहे.येथे करा संपर्ककृत्रिम हात-पाय प्राप्त करण्यासाठी व शिबिरात सहभागी होण्यासाठी सर्व लाभार्थ्यांनी नाव नोंदणीसाठी ९९६०७१८७००, ९७३००१५८४७, ९७३०१७३३५५, ८२७५५५४४५१ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. शिबिरात पोलिओ पीडित व्यक्तीला कृत्रिम हात-पाय मिळू शकणार नाही.
कृत्रिम हात-पाय वितरण शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 10:15 PM
लोकमत वृत्तपत्र समूह, साधू वासवानी मिशन पुणे, लायन्स क्लब कॉटन सिटी यवतमाळ व यवतमाळ केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कृत्रिम हात-पाय (जयपूर फूट) मूल्यांकन व वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
ठळक मुद्देरविवारी आयोजन : लोकमत समूह, साधू वासवानी मिशन, लायन्स, केमिस्टचा उपक्रम