शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

चांदोरेनगरात कृत्रिम टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 11:33 PM

नगरपालिका क्षेत्रात येणाऱ्या चांदोरेनगराची तहान भागविण्यासाठी प्राधिकरणाच्या नळासोबतच स्वतंत्र पाणीपुरवठा योजनाही आहे. या नळ योजनेच्या विहिरीला २२ फूट पाणी आहे. तरीही नगरपरिषदेच्या निष्काळजीपणाने ही विहीर बंद पडली आहे.

ठळक मुद्देपाणी पुरवठा विहिरीकडे दुर्लक्ष, टँकर फिरकेनाप्राधिकरणाचे नळ चढेना, नगर परिषदचे दुर्लक्ष

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नगरपालिका क्षेत्रात येणाऱ्या चांदोरेनगराची तहान भागविण्यासाठी प्राधिकरणाच्या नळासोबतच स्वतंत्र पाणीपुरवठा योजनाही आहे. या नळ योजनेच्या विहिरीला २२ फूट पाणी आहे. तरीही नगरपरिषदेच्या निष्काळजीपणाने ही विहीर बंद पडली आहे. या भागात मुबलक पाणी असूनही भीषण टंचाई निर्माण झाली आहे.मोहा विभागातील चांदोरेनगर ही सर्वात मोठी वसाहत आहे. या नगरासाठी पाणी पुरवठ्याची स्वतंत्र विहीर ग्रामपंचायतीने दिली होती. हा भाग नगरपरिषदेकडे हस्तांतरित झाला, तेव्हापासून टंचाईची स्थिती गंभीर झाली. पाणी पुरवठा विहिरीला २२ फूट पाणी आहे. या ठिकाणचे मोटारपंप बंद पडला. याबाबत नगरपरिषदेला सूचना केली. मात्र दोन महिन्यापासून दुर्लक्ष करण्यात येत आहे. आता ही मोटर विहिरीत पडली आहे. यामुळे ही पाणीपुरवठा योजना बंद आहे. प्राधिकरणाच्या नळाचे पाणी नगरात पोहचत नाही. खासगी बोअर आटले. संपूर्ण भिस्त टँकरवरच विसंबून आहे. नगरपरिषदेने या भागतील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी कुठल्याही उपाययोजना केल्या नाही. जुनी पाणीपुरवठा योजना सुरू करण्यासाठी तसदी घेतली नाही.ग्रामीण भागापेक्षाही वाईट अवस्था चांदोरेनगराची असल्याचे मत अर्चना वानखडे, विमल जाधव, सुरेखा साखरकर यांनी व्यक्त केले. या भागात पिण्याच्या पाण्याचे मोठे दुर्भिक्ष आहे. पाण्याचे स्रोत उपलब्ध आहे. असे असतानाही त्याकडे नगरपरिषदेने दुर्लक्ष केल्याचा आरोप विद्या जाधव, ताराबाई चंदनकार, वंदना घुले यांनी केला. या भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. महिन्यात दोन वेळा टँकर आला. २०० लिटर पाणी मिळाले. या पाण्यात काय होणार, असा प्रश्न सविता चावके, रत्नमाला तिखे यांनी उपस्थित केला. पाण्याच्या भीषण टंचाईने गावाकडे जाऊन कपडे धुण्याची वेळ आल्याचे मतही गृहिणींनी नोंदविले.खासगी टँकरही नंबर लावल्यावर येत नाही. त्यासाठी चार ते पाच दिवसाची प्रतीक्षा करावी लागते, असे मत प्राजक्ता बहाड यांनी नोंदविले. पाण्याच्या नियोजनात प्रशासन चुकले आहे. पावसाळ्यानंतर लगेच यावर उपाययोजना व्हायला हव्या होत्या. प्रत्यक्षात तसे घडले नाही. यामुळे पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे, असे रेखा चव्हाण, जयमाला तिखे, इंदू थाटे म्हणाल्या. आजपर्यंत कधीही पाण्यासाठी बाहेर जाण्याची वेळ आली नाही. मात्र यावर्षी रात्रीही पाण्यासाठी जावे लागते, असे मत शिवाणी हांडे, सुधा वानखडे, चंदा मार्इंदे, अनिता कवडे यांनी नोंदविले.आपल्या भागातले टँकर बंद झाले का?चांदोरेनगर परिसरात येणाऱ्या टँकरची संख्या घटली आहे. महिन्यात एखादा टँकर चुकून दिसतो. यामुळे या भागात पाण्याचे टँकर येणे बंद झाले काय, असाच प्रश्न या भागात शिरताच नागरिक विचारतात.पाण्यासाठी परीक्षाचयावर्षी प्रत्येक गृहिणीला डोक्यावर गुंड घेऊन लांबवर जाण्याची वेळ आली. पाणीटंचाई आहे म्हणून गाव सोडूनही जाता येत नाही. मुलांच्या परीक्षा आहे. रोजगाराचा प्रश्न आहे. यामुळे अनेक गृहिणींची अक्षरश: परीक्षाच सुरू आहे. पुरूष मंडळीला दररोजच्या कामासोबत पाण्यासाठी गावभर फिरावे लागत आहे, असे मत प्रमोद बहाड यांनी व्यक्त केले.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई