शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

अरुणावती प्रकल्प ठरला पांढराहत्ती

By admin | Published: August 27, 2016 12:56 AM

जिल्ह्यात सर्वात मोठा प्रकल्पाचा मान मिळालेला येथील अरुणावती प्रकल्प सिंचनाच्या बाबतीत अधोगतीकडे जात आहे.

३२५ कोटी खर्च : वितरण व्यवस्थेसाठी आणखी हवे एक कोटी प्रकाश सातघरे  दिग्रस जिल्ह्यात सर्वात मोठा प्रकल्पाचा मान मिळालेला येथील अरुणावती प्रकल्प सिंचनाच्या बाबतीत अधोगतीकडे जात आहे. सव्वातीनशे कोटी रुपये खर्च करूनही हा प्रकल्प कुचकामी ठरल्याचे दिसत आहे. अद्यापही वितरण व्यवस्थेचे पूर्ण जाळे तयार झाले नसून वितरण व्यवस्थेसाठी आणखी एक कोटी रुपयांची आवश्यकता आहे. गोदावरी खोऱ्यातील पैनगंगेची उपनदी असलेल्या अरुणावती नदीवर ३७ वर्षापूर्वी धरणाला मान्यता मिळाली. तालुक्यातील सावंगा बु. या गावाजवळ १९७८ साली प्रकल्पाला मान्यता मिळाली. चिरकुटासह तब्बल ११ गावांचे १३ ठिकाणी पुनर्वसन करून पाटबंधारे विभागाने हा प्रकल्प शेवटास नेला. या धरणाच्या जलोत्सारनीस एकूण लांबी चार ८६० मीटर आहे. जलोत्सारनीची लांबी १६२ मीटर आहे. या प्रकल्पाला १२ बाय आठ मीटरचे ११ वक्राकार दरवाजे असून उजव्या तीरावर सिंचन विमोचक तर डाव्या तिरावर विमोचक व जलविद्युत विमोचक आहेत. प्रकल्पाचा डावा मुख्य कालवा ५५.८० किमी लांबीचा असून उजवा कालवा ४६.२० किमीचा आहे. या प्रकल्पातून दिग्रस तालुक्यासह आर्णी, घाटंजी तालुक्यातील २५ हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाखाली आणण्याचे उद्दीष्ट होते. ६ डिसेंबर १९१८ रोजी या प्रकल्पाला मान्यता मिळाली. तेव्हा या प्रकल्पाची किंमत केवळ १९ कोटी १३ लाख रुपये एवढी होती. मात्र २००८ च्या सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार ती तब्बल ३३१.१८ कोटीवर पोहोचली. कालांतराने दरवर्षी या प्रकल्पासाठी शासनाने निधी दिल्याने मार्च २०१५ मध्ये ३२० कोटी रुपये झाली. एकीकडे प्रकल्पाचे व्यवस्थापन, सांडवा, कालवे व वितरण प्रणालीचे काम १०० टक्के झाल्याचे सांगण्यात येते. परंतु प्रत्यक्षात सिंचनाचा लाभ किती शेतकऱ्यांना मिळतो, हे कुणीही सांगत नाही. तब्बल १८ हजार लाभार्थी शेतकऱ्यांसाठी कामधेनू ठरण्याची क्षमता या प्रकल्पात आहे. परंतु हा प्रकल्प आता केवळ पांढरा हत्ती झाला आहे. केवळ मासेमारांसाठी हा प्रकल्प तर तयार केला नाही ना, असे बोलले जात आहे.