लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील दिग्रस गावानजीकचे अरुणावती प्रकल्प ९८ टक्के भरला आहे . यामुळे धरणाचे ३ दरवाजे १० सेंटिमीटरने उघडले आहेत. एकूण ३६ क्यूसेक्सचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. याबाबत प्रशासनानी अरुणावती नदीच्या आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे .गेल्या दोन दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. धरण प्रवण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने अरुणावती प्रकल्प ९८ टक्के भरला आहे . यंदा वरुणराजाने यवतमाळ जिल्ह्यावर कृपा केली आहे . जिल्ह्यात आत्तापर्यंत पडणाऱ्या पावसाच्या सरासरी पैकी एकूण ९० % पाऊस पडला आहे . यामुळे जिल्ह्यातील जवळपास सर्व धरण ओव्हर फ्लो झाली आहेत .यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे .
अरुणावती प्रकल्प ९८ टक्के भरला , धरणाचे ३ दरवाजे १० सेंटिमीटरने उघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 12:27 PM