शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

आईवर हात उगारताच लहान्याचा संताप अनावर; मोठ्या भावाच्या वर्मी घातला घाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2022 9:36 PM

Yawatmal News दारूच्या नशेत हिस्सेवाटणीसाठी वाद करायला आलेल्या मोठ्या भावाने आईवरच हात उगारला, आई जमिनीवर कोसळली हे दृश्य पाहून लहान भावाचा संताप अनावर झाला. त्याने घरातील धारदार चाकूने मोठ्या भावावर सपासप वार केले.

ठळक मुद्देढसाढसा रडला लहान भाऊ, दोन दिवस पोलीस कोठडी

 

यवतमाळ : दारूच्या नशेत हिस्सेवाटणीसाठी वाद करायला आलेल्या मोठ्या भावाने आईवरच हात उगारला, आई जमिनीवर कोसळली हे दृश्य पाहून लहान भावाचा संताप अनावर झाला. त्याने घरातील धारदार चाकूने मोठ्या भावावर सपासप वार केले. ही घटना मंगळवारी सकाळी १० वाजता माळीपुरा परिसरात घडली. भावाच्या आतताईपणामुळे आपण काय चूक केली हे लक्षात येताच लहान भावाने हंबरडा फोडला. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

येथील टांगा चौकात राहुल मनोहर बाचलकर (३६) आणि सतीश मनोहर बाचलकर (३२) या दोन भावांची वेगवेगळी फुलांची दुकाने आहेत. काही दिवसांपासून मोठा भाऊ राहुल हा व्यसनाच्या आहारी गेला होता. त्याने शेतीच्या वाटणीसाठी तगादा लावला. सोमवारी दोन्ही भावांच्या शेतीची नातेवाईकांनी मादणी शिवारात जाऊन वाटणी करून दिली. शेतातच मोठा भाऊ राहुल याने शिवीगाळ करून सतीशवर दगडाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नातेवाईकांनी दोघांची समजूत काढून त्यांना घरी आणले. वाद मिटला असे समजून नातेवाईक निघून गेले.

दुसऱ्या दिवशी राहुल धारदार शस्त्र घेऊन आई राहत असलेल्या घरापुढे पोहोचला. त्याला परिसरातील महिलांनी आवरून त्याच्या जवळचे शस्त्र काढून घेतले. नंतर पुन्हा तो घरी जाऊन परत आईच्या घरासमोर येऊन वाद घालू लागला. तो प्रसंग पाहून आईने लहान मुलाला घराबाहेर पडू नको असे सांगितले. आई दारात उभी राहून मोठा मुलगा राहुल याची समजूत काढत होती. यातच राहुलने आईवर हात उगारला. ती कोसळली. हे पाहून घरात असलेल्या सतीशचा संताप अनावर झाला. त्याने हाती लागलेला चाकू घेऊन राहुलच्या अंगावर चाल केली. चाकूचे वर्मी घाव बसल्याने राहुल जागेवरच कोसळला.

या घटनेनंतर काही मिनिटातच सतीश भानावर आला. आपल्या हातून मोठी अघटित घटना घडल्याचे पाहून तो ओक्साबोक्शी रडू लागला. पोलीस येईपर्यंत सतीश घरीच बसून होता. त्याला शहर पोलिसांनी अटक करून मंगळवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी