शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

यवतमाळ जिल्ह्यातील वनक्षेत्रावर ‘निपस स्केलटनायझर’चे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 12:30 PM

जिल्ह्यातील वनक्षेत्रावर ‘निपस स्केलटनायझर’चे आक्रमण झाले आहे. या किडीने एक लाख हेक्टर वनक्षेत्र काबीज केलाचा प्राथमिक अंदाज आहे. यामुळे झाडाची वाढ खुंटण्याचा धोका आहे.

ठळक मुद्देएक लाख हेक्टर वनक्षेत्र काबिजझाडाची वाढ खुुंटण्याचा धोका

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील वनक्षेत्रावर ‘निपस स्केलटनायझर’चे आक्रमण झाले आहे. या किडीने एक लाख हेक्टर वनक्षेत्र काबीज केलाचा प्राथमिक अंदाज आहे. यामुळे झाडाची वाढ खुंटण्याचा धोका आहे.तीन ते चार वर्षांपासून अज्ञात किडीने सागाच्या वृक्षावर आक्रमण केले आहे. कीटकशास्त्रज्ञांनी त्यावर संशोधन केले आहे. ‘निपस स्केलटनायझर’ नावाची कीड या वृक्षांवरील पान फस्त करीत आहे. दमट वातावरणात ही कीड झपाट्याने पसरते. यावर्षी सतत ढगाळ वातावरण असल्याने एक लाख हेक्टरवर क्षेत्र काबीज केल्याचा अंदाज वन विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.जिल्ह्यात पावणे तीन लाख हेक्टरवर सागाची वनसंपदा आहे. यातील ३० टक्के क्षेत्र या कीडीने काबीज केले आहे. विशेष म्हणजे, ही कीड चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, नंदुरबार यासह अनेक भागात दृष्टीस पडली आहे.या वृक्षांवर फवारणी करायची झाली तर विमानाच्याच मदतीने फवारणी करावी लागते. ते आपल्याकडे शक्य नाही. या किडीवर मात करणारे ‘बॅसिलस’ नावाचे बॅक्टेरिया कीटक शास्त्रज्ञानी विकसित केले आहे. मात्र त्यासाठी करावी लागणारी फवारणी उंच वृक्षांमुळे अशक्य आहे. छोट्या रोपांवर ही कीड आली होती. त्यावर औषधांच्या फवारणीमधून नियंत्रण मिळाले आहे. मात्र इतर ठिकाणी फवारणी शक्य नाही.पानांची चाळणीही कीड सागाच्या झाडाचे संपूर्ण पान खाऊन टाकते. ढगाळ वातावरणात मोठ्या प्रमाणात प्रजनन होते. यामुळे काही दिवसातच सागाचे हिरवेकंच वृक्ष उन्हाळ्याप्रमाणे निष्पर्ण दिसतात. कीडीमुुळे झाडाची प्रकाश संस्लेषण क्रिया थांबली आहे. यामुळे झाडाची वाढ आणि गोलाई प्रभावित होण्याचा धोका आहे.कीटक शास्त्रज्ञांकडून पाहणीसाग वृक्ष अचानक वाळत असल्याची बाब वन विभागाने वरिष्ठांना कळविली आहे. खबरदारी म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कीटक शास्त्रज्ञ मगर यांच्या नेतृत्वात पाहणी करण्यात आली. त्यांनी उपाययोजना सूचविल्या, अशी माहिती उपमुख्य वनसंरक्षक भानुदास पिंगळे यांनी ‘लोकमत’ला दिली.

टॅग्स :agricultureशेती