शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

केवायसीची भुरळ घालून पेन्शनवर डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 5:00 AM

सुरेंद्र राऊत लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : बँकेतील खात्यात असलेला पैसाही आता सुरक्षित राहिलेला नसल्याचे आणखी एका प्रकरणातून पुढे ...

ठळक मुद्देनिवृत्त अभियंत्याची ऑनलाईन फसवणूक : वर्षभरात सात तक्रारी सायबर सेलकडे

सुरेंद्र राऊतलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बँकेतील खात्यात असलेला पैसाही आता सुरक्षित राहिलेला नसल्याचे आणखी एका प्रकरणातून पुढे आले आहे. बँक खात्याला ‘आधार’ लिंक नसल्याने हे करण्याची प्रक्रिया करावी, अशी भुरळ घालून एका सेवानिवृत्त अभियंत्याच्या पेन्शनमधील दीड लाख रुपयावर ठगाने डल्ला मारला. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. जिल्ह्यात आतापर्यंत अशा प्रकारचे सात गुन्हे पुढे आले आहेत. सेवानिवृत्त अभियंते रवींद्र नानाजी काळे (६५, अंजनेश सोसायटी, यवतमाळ) यांना शुक्रवारी दुपारी मोबाइलवर एक काॅल आला. पुढच्या व्यक्तीने तुमचे बँक खाते बंद होऊ शकते. त्याला आधार व पॅन कार्डशी लिंक करणे आवश्यक आहे, अशी बतावणी केली. ही प्रक्रिया घरी बसूनच तुम्हाला पूर्ण करता येईल, असेही सांगितले. त्यासाठी ठगाने काळे यांना मोबाइलच्या प्ले स्टोअरमधून ‘एनी डेक्स’ हे ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. नंतर काही जुजबी माहिती विचारून मोबाइलला अर्धा तास हात लावू नका, अशी सूचना केली. दोन ते अडीच या अर्ध्या तासात काळे यांनी मोबाइलकडे बघितलेसुद्धा नाही. याचाच फायदा ठगाने घेत एनी डेक्स ॲपच्या माध्यमातून मोबाइलचे स्क्रीन शेअरिंग करत संपूर्ण ॲक्सेस मिळविला. ठगाने घरबसल्या रवींद्र काळे यांचा मोबाइल ऑपरेट करून बचत व पेन्शन खात्यातील रक्कम आयएफसीसीद्वारे आपल्या स्वत:च्या खात्यात टाकून घेतली. रवींद्र काळे यांनी ३ वाजता मोबाइल हातात घेऊन मुलाला फोन काॅलबद्दल सांगितले. वडिलांना फसविले गेल्याचे लक्षात येताच मुलाने त्यांना बँकेत जाऊन तत्काळ अकाउंट फ्रीज करण्यास सांगितले. रवींद्र काळे हे महाराष्ट्र बँकेच्या उमरसरा शाखेत पोहोचले. मात्र तेथील बँक व्यवस्थापकाने नेहमीप्रमाणे टोलवाटोलवी करीत काळे यांना दोष देणे सुरू केले. अखेर विनंतीनंतर काळे यांचे एटीएम कार्ड ब्लाॅक केले. पेन्शन व बचत खात्याबाबत कुठलीच प्रक्रिया केली नाही. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता खात्यातून दीड लाख रुपये काढल्याचा मेसेज काळे यांच्या मोबाइलवर धडकला. तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. बँकेत जाऊन अगाऊ सूचना दिल्यानंतरही स्थानिक बँक व्यवस्थापकाकडून कुठलेही सहकार्य मिळाले नसल्याचे काळे यांचे म्हणणे असून घडलेल्या प्रकाराबाबत त्यांनी शहरातील अवधूतवाडी  पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सायबर सेलमध्येही फसवणुकीच्या तक्रारीची प्रत दिली. 

छत्तीसगड, त्रिपुरा, बिहारमधून चालते रॅकेटसायबर सेलकडे अशा प्रकारे फसवणूक झालेल्या सात तक्रारी वर्षभरात आल्या आहेत. त्यापैकी तीन गुन्ह्यांतील अर्धीअधिक रक्कम परत मिळविण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. यात ठगविणारे हे छत्तीसगड, त्रिपुरा, बिहार, पश्चिम बंगाल या राज्यांतील असल्याचे दिसून आले. त्यांना ट्रॅक करत अटकेची कारवाई करणे स्थानिक पोलिसांना शक्य होत नाही. त्यानंतरही तीन गुन्ह्यांत जवळपास पाच लाखांची रक्कम परत मिळविण्यात यश आले.

ॲपच्या माध्यमातून खात्याच्या चाव्याच चोराच्या हाती

ठगाकडून संबंधित व्यक्तीला एनी डेक्स ॲप अथवा त्यासारखे दुसरे स्क्रीन शेअरिंग ॲप मोबाइलमध्ये डाऊनलोड करण्यास सांगितले जाते. त्यानंतर मोबाइलवरून ओटीपी जनरेट करून परस्पर बँक खात्यातील रक्कम काढून घेतली जाते. या प्रक्रियेत स्वत: बँक खातेधारकच पैसे काढून देतोय असे बँकेच्या रेकाॅर्डवर येते. दुसरीकडे खातेधारकाला आपला ओटीपी कोणी विचारला नाही त्यामुळे आपली रक्कम सुरक्षित आहे असे वाटते. प्रत्यक्षात मात्र स्वत:च्या मोबाइलच्या माध्यमातून बँक अकाउंटच्या चाव्या चोराच्या हाती दिल्यासारखाच फसवणुकीचा हा सारा प्रकार आहे. 

 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम