शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

नरभक्षक वाघिणीला नाईलाजाने घातली गोळी, शार्प शूटर नवाबची स्पष्टोक्ती 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 8:28 PM

आम्ही शिकारी असलो तरी आम्हालाही वन्यजीवांचे प्रेम आहे. १३ शेतकरी, शेतमजुरांचा बळी घेणा-या नरभक्षक वाघीण अवनीलाही जीवाने मारायचे नव्हतेच. तिला बेशुद्ध करण्यासाठी अनेक महिने वाट पाहिली, संधी शोधली.

यवतमाळ : आम्ही शिकारी असलो तरी आम्हालाही वन्यजीवांचे प्रेम आहे. १३ शेतकरी, शेतमजुरांचा बळी घेणा-या नरभक्षक वाघीण अवनीलाही जीवाने मारायचे नव्हतेच. तिला बेशुद्ध करण्यासाठी अनेक महिने वाट पाहिली, संधी शोधली. त्या रात्रीही बेशुद्धीचा प्रयत्न झाला. मात्र तिने थेट झडप घातल्याने आमच्या सोबतच्या इतरांचे संरक्षण करण्यासाठी नाईलाजाने तिच्यावर गोळी झाडावी लागली, अशी स्पष्टोक्ती हैदराबाद येथील शार्प शूटर नवाब शहाफत अली खान यांनी दिली. राळेगाव-पांढरकवडा तालुक्यातील वाघग्रस्त अनेक गावातील नागरिकांनी एकत्र येऊन मंगळवारी रात्री सावरखेड येथे नवाब व त्याच्या मुलाचा जाहीर सत्कार घेतला. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना नवाबने उपरोक्त भूमिका मांडली. सत्काराला उत्तर देताना शार्प शूटर  शहाफत अली खान म्हणाले, मीदेखील प्राणीमित्रच आहे. मानवाप्रमाणे वन्यप्राण्यांचाही प्राण आहे. त्यांनाही जीवन जगण्याचा अधिकार आहे. मी आजपर्यंत अनेक ठिकाणी वाघांना बेशुद्धदेखील केले. अवनीलासुद्धा सुरुवातीला ट्रॅक्यूलाईझ डॉट मारला. आता १५ ते २० मिनिटांनी ती बेशुद्ध होईल असे वाटले. पण ती अधिक आक्रमक झाली. अवनी झुडूपात लपली. आम्ही पाळतीवर होतो. अशातच तीने आमच्या जिप्सीवर हल्ला केल्याने शेवटच्या क्षणी आमचे प्राण धोक्यात येणार होते. आम्ही रक्षणार्थ गोळी झाडली. मात्र गोळी झाडताना प्रचंड वेदना झाली. तथापि नाईलाज होता, असे त्यांनी स्पष्ट केले.सोशल मीडिया, राजकीय मंडळी, पक्ष व वन्यजीव प्राणी मित्र आदी नरभक्षक अवनी वाघीणीस का मारले, असा जाब सरकारला विचारत असताना वाघीणग्रस्त परिवारातील ग्रामस्थांनी वाघीणीला ठार करणा-या शार्प शूटर  शहाफत अली खान व त्यांचा मुलगा अजगर अली खान व इतरांचा जाहीर सत्कार केला. सोबच एवढे दिवस वाघ शोध मोहीमेवर असलेले व वनकर्मचा-यांसोबत दिवाळी साजरी केली आहे. ग्रामस्थांनी सावरखेड येथील चौकात शुटर शहाफत अली खान व त्याचा मुलगा अजगर अली खान आणि दोन सहका-यांचा शाल, श्रीफळ व वाघिणीचा फोटो भेट देऊन जाहीर नागरी सत्कार केला. याप्रसंगी शहाफत अली खान म्हणाले, आम्ही इतर ठिकाणीही अशी मोहीम राबविली आहे. मात्र येथील शेतकरी, शेतमजूर यांचे भयग्रस्त जगणे आम्ही जवळून बघितले. ते वाघिणीच्या भितीने घराबाहेर येत नव्हते. गावक-यांचे प्रचंड नुकसान व प्राणहानी बघता वाघिणीचा बंदोबस्त आवश्यक होता. प्रत्यक्षात अवनीवर गोळी झाडताना मी पण गंभीर होतो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :TigerवाघYavatmalयवतमाळAvani Tigressअवनी वाघीण