स्मशानभूमी मार्गावर पथदिवे लावा
मारेगाव : शहरातील मार्डी रोडवर असलेल्या स्मशानभूमी मार्गावर पथदिवे नसल्याने रात्रीच्यावेळेस मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जाताना नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या मार्गावर आणि स्मशानभूमीत पथदिवे लावण्याची मागणी होत आहे.
निबंधक कार्यालयात पार्किंगचा अभाव
मारेगाव : शहरातील धामणी रोडवर असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयाला पार्किंगची व्यवस्था नसल्याने कार्यालयासमोर अगदी रस्त्यावर वाहने उभी केलेली असतात. त्यामुळे या ठिकाणावरून ये-जा करताना नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे याठिकाणी पार्किंगची व्यवस्था करावी, अशी मागणी या भागातील नागरिकांकडून केली जात आहे.
शासकीय कार्यालयात फलक लावा
मारेगाव : शहरात अनेक शासकीय कार्यालये आहेत, परंतु या कार्यालयात कामकाजाच्या वेळेचे फलक कुठेही लावल्या गेले नाही. कर्मचारी कधीही येतात व जातात. त्यामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयात कामकाजाच्या वेळेचे फलक लावावे, अशी मागणी होत आहे.
वणी-करंजी मार्गावर खड्डेच खड्डे
मारेगाव : वणी-करंजी या मुख्य राज्य मार्गावर गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे जागोजागी खड्डे पडलेले आहे. या मार्गावरील जड वाहतूक पाहता, हे खड्डे लवकर मोठे होतात. त्यामुळे बरेचदा अपघात असून, या मार्गावरील खड्डे बुजवावे, अशी मागणी होत आहे.