या सभेला संबोधित करताना प्रकाश पोहरे म्हणाले, तीनही कृषी कायदे हे शेतकरी विरोधी असून ते तात्काळ रद्द करायला हवे,
विकासाच्या नावाखाली लोकांना गंडवलं जात आहे, आवश्यकता नसताना हे कायदे पारित करण्यात आले. दहा वर्षा आधीच्या कायद्यात सुधारणा करायला हवी, त्यांना स्वायत्तता द्यावी. समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचे षड्यंत्र चालू आहे. मानवी हक्क संपविणे हाच सरकारचा उद्देश असल्याचा आराेप त्यांनी केला. किसान ब्रिगेड सभेच्या या जनजागृती सायकल रॅलीत अविनाश काकडे यांनी सुद्धा संबोधित केले, अॅड सतिश्चंद्र रोठे,मेजर शेषराव मुरोडियर,सरपंच श्रीराम मेश्राम,माजी उपसरपंच शाहिद रयानी,देवराव महाराज,विष्णु लोणकर,मनोज राठोड यांच्यासह ग्रामस्थ व शेतकरी माेठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन कैलाश कोरवते यांनी तर आभार सहदेव राठोड यांनी मानले. यशस्वीतेसाठी शेख नूर,किरण वाघमारे, रामेश्वर घारेकर, सोहेल खान यांनी परिश्रम घेतले.