आॅनलाईन लोकमतयवतमाळ : कोरेगाव भीमा प्रकरणातील मुख्य आरोपींना त्वरित अटक करावी, या मुख्य मागणीसाठी बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीने सोमवारी जिल्हाभरात निषेध रॅलीचे आयोजन केले होते. यवतमाळ येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेल्या या निषेध रॅलीने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले.कोरेगाव भीमा येथे शौर्य दिनाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या नागरिकांवर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात अनेक जण गंभीर जखमी झालेत. या प्रकरणातील मुख्य आरोपींना अद्यापही पोलिसांनी अटक केली नाही. यातील मुख्य आरोपी मिलिंद एकबोटे, मनोहर भिडे, आनंद दवे यांना अटक करून त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा. तसेच या प्रकरणाच्या निषेधार्थ पाळण्यात आलेल्या बंद दरम्यान पोलिसांनी अनेक निरापधारांवर गुन्हे दाखल करून त्यांंना अटक केली.त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावे आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मोर्चेकºयांनी विविध घोषणा लिहिलेले फलक उंचावून या घटनेचा निषेध केला. तसेच घोषणाही देण्यात आल्या. या निषेध रॅलीत प्रफुल्ल पाटील, प्रभाकर सावळे, अरुण गोसाई, किशोर शेंडे, सेनापती लभाने, ज्ञानेश्वर डहाणे, मोरेश्वर देशभ्रतार, भारत दिघाडे, शरद मेश्राम, कुंदा तोडकर, अर्चना दातार, सारिका भगत यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले होते.
यवतमाळात बहुजन क्रांती मोर्चाची रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 12:17 AM
कोरेगाव भीमा प्रकरणातील मुख्य आरोपींना त्वरित अटक करावी, या मुख्य मागणीसाठी बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीने सोमवारी जिल्हाभरात निषेध रॅलीचे आयोजन केले होते.
ठळक मुद्देकोरेगाव भीमाप्रकरण : हल्ल्यातील मुख्य आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी