लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जे लोक तळागाळातून येतात, तेच राज्य कारभार सुंदर चालवितात, हा आजवरचा अनुभव आहे. बाळासाहेब मांगूळकर हे कोणत्या एका पक्षाचे उमेदवार नसून ते सर्वसामान्यांचे उमेदवार आहेत. ते या मातीशी समरस झाले आहेत. त्यांना निवडून आणूनच आपण दिवाळी साजरी करूया, असे भावनिक आवाहन माजी खासदार विजय दर्डा यांनी केले.येथील टिंबर भवनात गुरुवारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. त्यावेळी विजय दर्डा मार्गदर्शन करीत होते. माजी खासदार विजय दर्डा पुढे म्हणाले, यवतमाळ मतदारसंघातील लोकांना अनेक वषार्नंतर त्यांच्या मनातला उमेदवार मिळाला आहे. त्यामुळे आता या मतदारसंघातील प्रत्येक मनुष्य उमेदवारच आहे. लोकांना आपले प्रश्न सोडविणारा आमदार हवा आहे. आपल्या जीवनात सुबत्ता कोणता आमदार आणून शकेल, हे लोकांवरच अवलंबून आहे.यवतमाळमध्ये सध्या बेंबळावरून पाणी आणण्याची अमृत योजना अपूर्ण आहे. ३०२ कोटींच्या भ्रष्टाचाराचे ग्रहण या योजनेला लागले आहे. हे ग्रहण दूर करण्यासाठी बाळासाहेब मांगूळकरच आमदार हवेत. चापडोह, निळोणा हे दोन्ही प्रकल्प ओव्हरफ्लो झाले. तरी यवतमाळ शहराला चार दिवसाआड पाणी दिले जात आहे. विकासाच्या नावावर शहर भकास करण्यात आले आहे. रस्त्यावर खड्डे वाढले, त्यामुळे अपघात होत आहे. प्रदूषण वाढले आहे. सध्याच्या राज्यकर्त्यांनी केलेले खड्डे बाळासाहेब मांगूळकरच बुजवू शकतील. यवतमाळ शहरात गुन्हेगारी वाढली असून त्या गुन्हेगारीला राजकीय आश्रय मिळत आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. गेल्या पाच वर्षात यवतमाळात कोणताही नवीन उद्योग आला नाही. आणि जे उद्योग येथे आधीपासूनच होते, ते या राज्यकर्त्यांच्या ह्यउद्योगाह्णमुळे बंद पडत आहेत. त्यातून बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. आधीच्या सरकारने प्रयत्न करून यवतमाळात सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आणले. पण आज त्याची काय अवस्था आहे? तेथे तज्ज्ञ डॉक्टर नाही. कोट्यवधीच्या मशनरी बंद आहे. सर्वसामान्य लोकांना त्याचा फायदा मिळत नाही. भाजप सरकारने ग्रामीण महिलांसाठी आणलेल्या योजना केवळ कागदावर आहेत. शेतमालाला भाव मिळत नाही. शेतकऱ्यांच्या विवंचना कायम असून आत्महत्या वाढत आहेत.त्यामुळे सर्व समस्यांचे एकच उत्तर आहे, ते म्हणजे बाळासाहेब मांगूळकर. त्यांना निवडून आणण्यासाठी प्रत्येक कार्यकत्यार्ने आपापल्या गावात जोमाने काम करावे, असे आवाहन माजी खासदार विजय दर्डा यांनी केले.शहरातील पाणी, रस्ते, नाल्या या समस्या सोडविण्यासाठी मी प्राधान्याने काम करेल. गुन्हेगारीचा प्रश्न सोडविणार, असे आश्वासन बाळासाहेब मांगूळकर यांनी दिले. सभेचे प्रास्ताविक माजी आमदार कीर्ती गांधी यांनी केले. यावेळी आमदार डॉ. वजाहत मिर्झा, आमदार ख्वाजा बेग, माजी खासदार सदाशिवराव ठाकरे, माजी आमदार विजयाताई धोटे, डॉ. टी.सी.राठोड, संध्याताई सव्वालाखे, क्रांती राऊत आदींनी मनोगत व्यक्त केले.
Maharashtra Election 2019; बाळासाहेब लोकांचे स्वप्न साकारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2019 2:54 PM
बाळासाहेब मांगूळकर हे कोणत्या एका पक्षाचे उमेदवार नसून ते सर्वसामान्यांचे उमेदवार आहेत. ते या मातीशी समरस झाले आहेत. त्यांना निवडून आणूनच आपण दिवाळी साजरी करूया, असे भावनिक आवाहन माजी खासदार विजय दर्डा यांनी केले.
ठळक मुद्दे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे विधानसभा निवडणुकीचे उमेदवार अनिल उर्फ बाळासाहेब मांगूळकर यांचा नामांकन अर्ज दाखल करण्यापूर्वी झालेल्या या मेळाव्याला कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त गर्दी केली होती.