संजय भगत ।लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : तालुक्यातील भांब येथील नर्सरीत लावण्यात आलेली रोपटी पूर्णत: वाळली आहे. यामुळे शासनाचे ३३ कोटी वृक्ष लागवडीचे स्वप्न कसे पूर्ण होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.पुढील वर्षी राज्यात १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत ३३ कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबविला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आदेशानुसार राज्यभर नसॅरीत रोपे जगवली जात आहे. ही रोपे आॅनलाईन नोंदणी केल्यास उपलब्ध करून दिली जातात. तालुक्यात मात्र त्यांच्याच अखत्यारीतील नसॅरीत यात खोडा घातला जात आहे.भांब येथील नियतक्षेत्र भांब कक्ष क्रमांक ३ राज्य योजना वनिकरणाच्या कार्यक्रमांतर्गत मिश्ररोपवन क्षेत्र २० हेक्टरमध्ये २०१७-१८ करिता रोपटी तयार करण्यात आली. लाखो रूपये खर्चून ही नर्सरी तयार करण्यात आली. मात्र योग्य नियोजनाअभावी रोपाची मागणीच कुणी केली नाही. तसेच नर्सरीकडे वन विभागाचे कमालीचे दुर्लक्ष झाल्याने लाखोंची रोपटी वाळून गेली आहे.कार्यकाळ संपल्याचे तकलादू कारण३३ कोटी वृक्ष लागवड उपक्रम पूर्णत्वास नेण्यासाठी आत्तापासूनच वनाधिकाऱ्यांच्या बैठकीचे सत्र सुरू आहे. वन विभागाचे प्रधान मुख्य सचिव विकास खारगे राज्यातील नर्सरीतील रोपांची माहिती घेत आहेत. मात्र तालुक्यातील नर्सरीमधील रोपटी वाळून गेली आहे. तरीही वरिष्ठ अधिकारी लक्ष देण्यास तयार नाही. नर्सरीमधील रोपटी वाळून का गेली, याबद्दल नर्सरीचा कार्यकाळ संपल्याचे तकलादू कारण सांगितले जात आहे.
भांबच्या नर्सरीतील रोपटे वाळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2019 10:17 PM
तालुक्यातील भांब येथील नर्सरीत लावण्यात आलेली रोपटी पूर्णत: वाळली आहे. यामुळे शासनाचे ३३ कोटी वृक्ष लागवडीचे स्वप्न कसे पूर्ण होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
ठळक मुद्देवन विभागाचे दुर्लक्ष : ३३ कोटी वृक्ष लावगडीचे स्वप्न अपूर्णच