- रूपेश उत्तरवारयवतमाळ - कीटकनाशक फवारणीमुळे शेतमजुरांना होत असलेल्या विषबाधेची दखल घेऊन कृषी आणि जलसंधारण विभागाने पाच घातक किटकनाशकांवर दोन महिन्यांसाठी बंदी घातली आहे.फवारणीतून विषबाधा झाल्याने गेल्यावर्षी एकट्या यवतमाळ जिल्ह्यात २० पेक्षा जास्त शेतकरी, मजुरांचे बळी गेले होते. यंदाही तोच प्रकार सुरू झाला आहे. त्यामुळे १५ सप्टेंबरपासून दोन महिन्यांपर्यंत पाच किटकनाशकांवर बंदी घातली आहे. कृषी व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी तसे आदेश काढले आहेत. सर्व औषधे एकत्र केल्याने विषाची तीव्रता वाढते. त्यामुळे कायम स्वरुपी बंदी घालण्याची मागणी केंद्रीय किटकनाशक मंडळ फरीदाबादकडे करण्यात आली.बंदी घातलेली कीटकनाशकेप्रोफेनोफॉस ४० टक्के आणि सिप्रेमेथ्रीन ४ टक्के ईसी, फिप्रोनिल ४० टक्के आणि इमीडॅक्लोप्रीड ४० टक्के डब्ल्यू जी, अॅसिफेट ७५ टक्के एसपी, डीफेन्थीरोन ५० टक्के डब्ल्यूपी आणि मोनोक्रोटोफॉस ३६ टक्के एसएल.
विषबाधेमुळे पाच कीटकनाशकांवर बंदी, तूर्तास दोन महिन्यांसाठी उपाययोजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 5:41 AM