शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
2
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
3
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
5
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
6
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
7
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
8
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
9
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
10
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
12
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
13
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
14
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
15
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
16
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
18
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
19
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
20
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट

यवतमाळात खासगी टँकरवर बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 10:01 PM

शहरात सुरू असलेला पाण्याचा व्यापार रोखण्यासाठी प्रशासनाने खासगी टँकरला नगरपरिषद हद्दीतील सार्वजनिक आणि वैयक्तिक जलस्त्रोतावरून पाणी उपशास बंदी घातली आहे.

ठळक मुद्देएसडीओंचे आदेश : सार्वजनिक व वैयक्तिक जलस्त्रोतावरून पाणी घेण्यास निर्बंध

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरात सुरू असलेला पाण्याचा व्यापार रोखण्यासाठी प्रशासनाने खासगी टँकरला नगरपरिषद हद्दीतील सार्वजनिक आणि वैयक्तिक जलस्त्रोतावरून पाणी उपशास बंदी घातली आहे. या संदर्भातील आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांनी निर्गमित केला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.यवतमाळ शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गत तीन महिन्यांपासून यवतमाळकर पाण्यासाठी व्याकुळ झाले आहे. नळाचे पाणी तीन आठवड्यानंतरच मिळत असल्याने टंचाईची तीव्रता वाढली आहे. अनेकांकडे तीन आठवडे पाणी साठवून ठेवण्याची कुठलीच सोय नाही. या परिस्थितीचा फायदा घेत यवतमाळात पाण्याचा चक्क व्यापार सुरू झाला. सुरुवातीला ४०० रुपयात मिळणारे पाण्याचे टँकर ८०० रुपयांपर्यंत जावून पोहोचले आहे. शहरात नगरपरिषद आणि राजकीय पक्षांच्या टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा होत आहे. मात्र हा पाणीपुरवठा अपुरा असल्याने खासगी टँकरधारकांचे चांगभले होत आहे. पाण्याचा हा व्यापार रोखण्यासाठी प्रशासनाने आता कडक पाऊले उचलली आहे.पाणीटंचाई लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी यवतमाळ शहर यापूर्वीच टंचाईक्षेत्र म्हणून घोषित केले आहे. सुरुवातीला बोअरवेल खोदण्यावर आणि बांधकामांवर बंदी आणण्यात आली. परंतु खासगी टँकरधारक पाण्याचा वारेमाप उपसा करून पाणी विकत असल्याने जलस्त्रोत तळाला जात आहे. भूजल पातळीही वेगाने खाली जात आहे. त्यामुळे उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे यांनी टँकरला शहरातून पाणी उपसा करण्यास बंदी आणली आहे. या आदेशानुसार, खासगी टँकरधारकांना सार्वजनिक आणि वैयक्तिक जलस्त्रोतावरून पाणी उपसण्यास निर्बंध घालण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र भूजल अधिनियम २००९ च्या नियम ५२ नुसार दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.यवतमाळ शहरात नगरपरिषदेच्या मोफत टँकरसोबतच राजकीय पक्षांच्या टँकरद्वारेही मोफत पाणीपुरवठा केला जात आहे. आता खासगी टँकरला पाणी उपशास बंदी घातल्याने मोफत पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला नगरपरिषदेत नोंदणी करावी लागणार आहे. या ठिकाणी टँकरचा नंबर देऊन कोणत्या भागात पाणीपुरवठा केला जातो, हेही सांगावे लागणार आहे. खासगी टँकरवर नियंत्रण आणण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे. आता टँकरधारकांना पाणी आणण्यासाठी नगरपरिषद हद्दी बाहेरील जलस्त्रोंतांचा शोध घ्यावा लागणार आहे.पाण्याचा व्यापार रोखण्यासाठी प्रशासनाची उपाययोजनावॉशिंग सेंटरवरही बंदीयवतमाळ शहरात खासगी टँकरला पाणी उपशास बंदी घालण्यापाठोपाठ शहरातील सर्व वाहनांच्या वॉशिंग सेंटरवरसुद्धा बंदी घालण्यात आली आहे. या ठिकाणी दुष्काळी परिस्थितीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.पाण्याचा काटकसरीने वापर कराभीषण पाणीटंचाईच्या काळात नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा. घरातील नळांची गळती होऊ देऊ नये, खासगी बांधकामे पूर्णपणे बंद करावी, बाथरूममधील किंवा स्वयंपाकघरातील पाण्याला वाट करून देवून ते पाणी जमिनीत मुरविल्यास पाण्याचा स्तर वाढविण्यास मदत होईल. अंघोळ करताना शॉवरऐवजी बकेटमध्ये पाणी घेवून वापरावे. अतिरिक्त पाण्याचा वापर अंगणात किंवा बाहेर शिंपडण्यासाठी करू नये, पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन नगरपरिषदेच्यावतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई