शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
5
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
6
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
7
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
8
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
9
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
10
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

बंजारा समाज प्रबोधन पर्वाचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 11:35 PM

येथील तीर्थरूप मंगल कार्यालयाजवळील संत सेवालालनगरीत आयोजित राज्यस्तरीय तीन दिवसीय बंजारा समाज प्रबोधन पर्व व सांस्कृतिक महोत्सवाचा सोमवारी समारोप झाला.

ठळक मुद्देबक्षीस वितरण : लेंगी नृत्य स्पर्धेत बोरगाव प्रथम

ऑनलाईन लोकमतआर्णी : येथील तीर्थरूप मंगल कार्यालयाजवळील संत सेवालालनगरीत आयोजित राज्यस्तरीय तीन दिवसीय बंजारा समाज प्रबोधन पर्व व सांस्कृतिक महोत्सवाचा सोमवारी समारोप झाला.समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री शिवाजीराव मोघे होते. प्रमुख पाहुणे म्हणून भारत राठोड, अनिल आडे, राजुदास जाधव, पंचायत समिती सभापती सुरेश जयस्वाल, रमेश चव्हाण, वनमाला राठोड, आकाश राठोड, आकाश जाधव आदी मंचावर उपस्थित होते. या तीन दिवसीय प्रबोधन पर्वात विविध विषयांवर विचारमंथन करण्यात आले. राज्यात प्रथमच असा कार्यक्रम घेण्यात आला. यात बंजारा समाजाची वैचारिक बांधणी झाली. या प्रबोधन पर्वात जिल्ह्याबाहेरील बंजारा समाजही मोठ्या संख्येने सहभागी झाला होता.या पर्वादरम्यान लेंगी नृत्य स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत पुसद तालुक्यातील बोरगाव येथील संत सेवालाल महाराज चमूने प्रथम क्रमांक पटकावला. बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा येथील जय शामकी माता मंडळाने दुसरा, पुसद तालुक्यातील बोरी येथील हासकी माता महिला मंडळाने तिसरा, वाशिम जिल्ह्यातील पांगरी येथील नागनाथ महिला मंडळाने चौथा, बुलडाणा जिल्ह्यातील आसोला येथील जगदंबा लेंगी महिला मंडळाने पाचवा क्रमांक पटकावला. रुई गड येथील जगदंबा महिला मंडळाने सहावा, वसंतनगर दिग्रस येथील प्रताप महिला मंडळाने सातवा, भांब ता.महागाव येथील सामकी माता महिला मंडळाने आठवा क्रमांक पटकाविला. याशिवाय खेडबिड येथील मंडळाला प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले.पुरुष नृत्य स्पर्धेत दारव्हा तालुक्यातील भोपापूर येथील रसपूत बंजारा मंडळाने पहिला, वाशिम जिल्ह्यातील खापडदरी येथील जय सेवालाल लेंगी मंडळाने दुसरा तर वाशिम जिल्ह्यातीलच भली येथील जय सेवालाल मंडळाने तिसरा क्रमांक पटकावला. उखळी येथील जय सेवालाल मंडळाने चौथा, वाशिम जिल्ह्यातील जय सेवालाल मंडळाने पाचवा, आमला ता.दिग्रस येथील जय सेवालाल महाराज मंडळाने सहावा क्रमांक पटकाविला. या शिवाय मानुदास महाराज लेंगी मंडळ बोरगाव, ज्वालामुखी लेंगी मंडळ वाशिम यांनीही बक्षीस पटकाविले.या सर्व मंडळांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. संचालन सुरेश पवार तर आभार आकाश जाधव यांनी मानले. यावेळी समाजबांधव उपस्थित होते.