शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

गणवेशाच्या खात्याला बॅँकांच्या दंडाचा घोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 12:16 AM

बँक खाती तयार नसल्याने जिल्ह्यातील ८१ हजार विद्यार्थी अद्यापही गणवेशापासून वंचित आहेत. तर ज्या ७८ हजार विद्यार्थ्यांनी खाते उघडले, त्यांना बँकेकडून ‘मिनिमम बॅलेन्स’ न ठेवल्याच्या कारणाने दंड बसत आहे.

ठळक मुद्देदीड लाख विद्यार्थी गोत्यात : ४०० च्या अनुदानासाठी दोन ते पाच हजार ‘मिनिमम बॅलेन्स’चा निकष

अविनाश साबापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बँक खाती तयार नसल्याने जिल्ह्यातील ८१ हजार विद्यार्थी अद्यापही गणवेशापासून वंचित आहेत. तर ज्या ७८ हजार विद्यार्थ्यांनी खाते उघडले, त्यांना बँकेकडून ‘मिनिमम बॅलेन्स’ न ठेवल्याच्या कारणाने दंड बसत आहे. ४०० रुपयांच्या गणवेशासाठी चक्क दोन ते पाच हजार रुपयांचे बॅलेन्स ठेवण्याची वेळ गोरगरीब पालकांवर येत आहे. साहजिकच असा ‘बॅलेन्स’ न ठेवल्याने जमा झालेले ४०० रुपये दंडातच कपात होत आहे. मात्र, शिक्षण विभाग याबाबत अनभिज्ञ असल्याचा आव आणत आहे.सर्व शिक्षा अभियानातून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत मिळणारा गणवेश यंदा शासन, शिक्षणाधिकारी यांच्यासह शिक्षक, पालक आणि प्रत्यक्ष विद्यार्थ्यांसाठीही फसवे गाजर ठरत आहे. यवतमाळ जिल्ह्यात असलेल्या १ लाख ५९ हजार ५११ लाभार्थी विद्यार्थी आहेत. शिक्षण विभागाच्या आकडेवारीनुसार, सप्टेंबरपर्यंत केवळ ७८ हजार १२० विद्यार्थ्यांची बँक खाती उघडण्यात आलेली आहे. त्यापैकी गणवेश पावत्या सादर करणाºया केवळ ४२ हजार १२८ विद्यार्थ्यांच्या खात्यात प्रत्येकी ४०० रुपये जमा करण्यात आले. तर उर्वरित ३५ हजार ९९२ विद्यार्थ्यांनी गणवेश घेतला की नाही, याची खात्री शिक्षण विभागातील अधिकाºयांनाही देणे अशक्य झाले आहे. शिवाय, ८१ हजार ३९१ विद्यार्थी अद्यापही बँक खातेच उघडू शकलेले नाही. अशा १ लाख १७ हजार ३८३ विद्यार्थ्यांना अर्धे सत्र उलटल्यावरही गणवेश मिळालेला नाही.ज्या ४२ हजार विद्यार्थ्यांच्या खात्यात शिक्षण विभागाकडून ४०० रुपये जमा करण्यात आले, त्यांच्यापुढे बँकांच्या नियमामुळे नवेच संकट उभे झाले आहे. गणवेशाच्या अनुदानासाठी शासनाने विद्यार्थी आणि त्याचा पालक या दोघांचे संयुक्त खातेच उघडण्याचे निर्देश दिले आहेत. मुळात हे खाते उघडण्यासाठीच ५०० रूपयांची जमा ठेवण्यास बँकेकडून सांगितले जात आहे. काही बँकांनी संयुक्त खाते ‘झिरो बॅलन्स’वर उघडले. मात्र, या खात्यात ‘मिनिमम बॅलन्स’ ठेवण्याचा बँकांचा नियम आहे. साहजिकच बहुतांश विद्यार्थ्यांच्या खात्यात मिनिमम बॅलन्सची मर्यादा पाळण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्याच्या खात्यातून ५० रुपयांपर्यंत दंडाची कपात केली जात आहे. ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थ्यांचे खाते स्टेट बँकेत आहे. या बँकेच्या नियमानुसार, ग्रामीण शाखेसाठी २ हजार, शहरी शाखेतील खात्यासाठी ३ हजार रुपये, तर महापालिका क्षेत्रात ५ हजार रुपये ‘मिनिमम बॅलन्स’ ठेवणे आवश्यक आहे.४०० रुपयांच्या गणवेश निधीसाठी ग्रामीण विद्यार्थ्यांना आपल्या खात्यात २ हजार रुपये ‘मेन्टेन’ करणे आवश्यक झाले आहे. ते कोणत्याही विद्यार्थ्याने न केल्यामुळे त्यांच्या ४०० रुपयांच्या निधीतून ५० रुपयांपर्यंतची कपात केली जात आहे. शिवाय, खात्यात मिनिमम बॅलन्स न ठेवल्यामुळे विड्रॉल करण्यावरही बंधने येत असल्याच्या अनेक पालकांच्या तक्रारीआहेत.