शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
3
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
5
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
6
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
7
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
8
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
9
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
10
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
11
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
12
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
13
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
14
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
15
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
16
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
17
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
18
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
19
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
20
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल

लेकरं बेमार.. म्हतारे राखनीले... न् झोपडं बेवारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2017 12:41 AM

नईतरुन पोरं बेमार पल्ले बाप्पा... आमी म्हतारे त्याह्यच्यासंग दवाखान्यात राखनीले बसून हावो. मजुरी नाई न् फजुरी नाई... मजबुरी हाये. आमच्यासाठी फवारले गेल्ता आता त्येच्यासाठी आमीस आलो..

ठळक मुद्देफवारणीतल्या मजुरांचे मायबाप निराधार : कोरड्या राजकीय भेटींनी सांत्वनाऐवजी संताप

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नईतरुन पोरं बेमार पल्ले बाप्पा... आमी म्हतारे त्याह्यच्यासंग दवाखान्यात राखनीले बसून हावो. मजुरी नाई न् फजुरी नाई... मजबुरी हाये. आमच्यासाठी फवारले गेल्ता आता त्येच्यासाठी आमीस आलो.. घरात काय शिजत असन काय सांगाव? लोकं येऊन भेटून चाल्ले, त्याह्यच्या येण्यानं तब्येतय सुधरत नाई अन् मजुरीबी भेटत नाई...पुढ का का घडन का सांगू बाप्पा...फवारणीतून विषबाधीत झालेल्या गोरगरिबांना दररोज भेटी देणाºया व्हीआयपी मंडळींच्या काळजाला दिग्रसच्या (बेलोरा) वृद्ध वच्छलाबार्इंची ही व्यथा पाझर फोडू शकेल का? वच्छलाबार्इं भरभडे यांचा तरुण मुलगा दसºयाच्या आदल्या दिवशी फवारणीच्या मजुरीला गेला होता. पण विषबाधा झाली. मुलगा दवाखान्यात सून बाळंतपणाला माहेरी अन् म्हाताºया वच्छलाबाई मुलासोबत...ही वृद्ध आई म्हणाली, ‘दहा दिस झाले, आमी कोनीस मजुरीले नाई गेलो. घरी लहान लेकरू हाये.. काय रांधत असन अन् काय खात असन देवालेस ठाऊक. येच्या ईलाजाले पैसे नोहोते. याले दोनशे मांग, त्याले दोनशे मांग असं करूनश्यानं गाडं लोटत होवो..!’ फवारणीच्या मजुरीला जाणारे अन् त्यात विषबाधा झालेले सारेच गावाकडचे तरुण आहेत. असे शेकडो तरुण आज शासकीय रुग्णालयात तडफडत आहेत. त्यांच्याकडे काळजीने पाहात, डोळे पुसत बसलेले म्हातारे आईवडील नातवांचे चेहरे आठवून आठवून देवाची करुणा भाकत आहेत.‘नयीतरुन पोरं फवारणीनं भोकने होऊने बसले... सरकार पैसे देईन म्हंते. पण थ्या पैशाले का चाटन का त्याह्यचे बायकापोरं? पुढं एवढं मोठं आयुष्य हाये...’ बाजूच्याच बेडवरच्या बाधीत तरुणाची आई चंद्रकला कातावून बोलल्या, ‘आत्ताशीनच येक कोन हो का तं नेताजी येऊन गेला. मत मांगतल्यावानी टोंडाकडं पाहे.. माहा पोरगं ढोरावानी बोंबलते.. आग आग म्हंते.. अन् ह्ये नेताजी म्हने न्याय भेटन.. अगा कवा भेटन थो न्याय? पोटासाठी डोळे देल्ले आता डोळ्यायसाठी जीव घेसान का?’विषबाधेने कळवळणाºया पोरांकडे पाहून म्हाताºया आईवडिलांवरच जीव सोडण्याची वेळ आली आहे. पण राजकीय पक्षांचे पुढारी राजकीय बॅनर लावूनच त्यांच्या भेटी घेत आहेत. भेटी देणारे केवळ सुतकी चेहरे करून उभे राहतात आणि खूप मोठी समाजसेवा केल्याच्या आविर्भावात आले तसे निघून जातात. त्यांचे कोरडे शब्द संतापाचे कारण ठरत आहेत. तोच संताप पती गमावलेल्या कळंबच्या मंगला देवीदास मडावी या महिलेने व्यक्त केला, बारा दिवसापासून रोज लोकं आमाले भेटाले येऊन राह्यले. मंग आमाले कामाले कसं जाता येईन? कामावर गेलो तरी पोलीस धरू-धरू घरी आणते. तुमी लोकं येता, पण माही मजुरी बिडते अन् तुमी तरी का देता? काल तं माह्याजवळ तेल न् चहापत्ती घ्याले पैसे नव्हते. १० रुपये उसने घेतले अन् दिवस ढकलला...’तिवसाचा ब्रह्मानंद श्रीराम आडे, कोची ता. राळेगावचा अरुण नागोजी आत्राम हे डोळे गमावून बसले आहे. त्यांच्याच बाजूच्या बेडवर तळणीचा (ता. आर्णी) राहुल पंजाब मंगल पवार हा तरुणही विव्हळत आहे. आपल्या वेदना तो रोज नातेवाईकांना मोडक्या तोडक्या भाषेत कागदावर लिहून सांगतोय. ‘गळ्यात काहीतरी लटकल्यासारखं वाटते’ हे त्याचे शब्द डॉक्टर, कृषी अधिकारी, कृषीमंत्र्यांना कळतील का?उत्सवी कार्यकर्त्यांनो, माणसांना मदत करासरकारने मृतांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर केली, अजून भेटली नाही. जिवंत माणसं तळमळत आहे. त्यांना केवळ राजकीय भावनेतून भेटी देण्याचा सपाटा सुरू आहे. सरकार तर झोपलेले आहेच. पण यवतमाळच्या समाजिक संस्थाही निपचित आहेत. एकाही संस्थेने रुग्णालयात जाऊन रुग्णांची वास्तपूस्त केली नाही, की नातेवाईकांच्या जेवणाची सोय केली नाही. इतर उपक्रमांवर भरमसाठ खर्च करणाºया सामाजिक कार्यकर्त्यांनी जिवंत माणसांसाठी काहीतरी करण्याची आता वेळ आली आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी या गरिबांसाठी आता पुढे यावे, असे मत शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे देवानंद पवार यांनी व्यक्त केले.