शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

मुलांच्या हाती मोबाइल द्याल तर खबरदार! ग्रामपंचायतीचा ठराव : पालकांचे समुपदेशन, नंतर दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 9:32 AM

Mobile: संवादाऐवजी मनोरंजन आणि गैरवापरासाठीच मोबाइलचा वापर होऊ लागल्याने बान्शी ग्रामपंचायतीने १८ वर्षांखालील मुलांसाठी मोबाइलबंदी करण्याचा ठराव मंजूर केला.

- बालाप्रसाद सोडगिरबेलोरा (जि. यवतमाळ) : संवादाऐवजी मनोरंजन आणि गैरवापरासाठीच मोबाइलचा वापर होऊ लागल्याने बान्शी ग्रामपंचायतीने १८ वर्षांखालील मुलांसाठी मोबाइलबंदी करण्याचा ठराव मंजूर केला. यासाठी मुलांसह पालकांचे समुपदेशन करण्यात येणार असून, त्यानंतरही तरुणाईकडून मोबाइलचा वापर न थांबल्यास दंड ठोठावण्यात येणार आहे. पुसद तालुक्यातील बान्शी ग्रामपंचायतीने थेट ग्रामसभेत ठराव घेऊन १८ वर्षांखालील मुलामुलींना मोबाइलचा वापर करण्यास मनाई केली आहे. मंगळवारी झालेल्या याच ग्रामसभेत गावात प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना लागू करण्याचा निर्णय घेत निराधार लोकांसाठी वृद्धाश्रम उभारण्याचा संकल्पही करण्यात आला. मोबाइलचा गैरप्रकारांसाठी वापर होत असल्याच्या घटना पुढे आल्यानंतर ग्रामस्थांनी १८ वर्षांखालील मुलांना मोबाइल वापरण्यास बंदी घालायला हवी, अशी मागणी केली. ही मागणी सरपंच गजानन टाले यांच्यासह सदस्यांनी उचलून धरली. मोबाइल वापरावर बंदी घातल्यास विद्यार्थी अभ्यासाकडे वळतील तसेच पारंपरिक मैदानी खेळांमधील रुची त्यांच्यात पुन्हा वाढेल, या हेतूनेच ग्रामपंचायतीने मोबाइलबंदीचा हा ठराव घेतला असल्याचे सरपंच टाले आणि उपसरपंच रेखा राठोड यांनी सांगितले. 

अनेक विद्यार्थी तासन् तास पब्जीसह इतर खेळ खेळत असल्याचे दिसून आले. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर होऊ लागल्याने ग्रामपंचायतीला मोबाइल वापर बंदीचा ठराव घ्यावा लागला. .     - रेखा राठोड, उपसरपंच, बान्शी, ता. पुसद, जि. यवतमाळ 

गावाच्या हितासाठीच मोबाइलबंदीचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांसह पालकांचे समुपदेशन करण्यात येईल. त्यानंतरही १मुलांकडून मोबाइलचा वापर न थांबल्यास दंडात्मक कारवाईसह वाढीव टॅक्स लावण्यात येईल.     - गजानन टाले, सरपंच, बान्शी, ता. पुसद, जि. यवतमाळ

टॅग्स :Mobileमोबाइलgram panchayatग्राम पंचायत