तिळ गूळ घ्या, गोडगोड बोला. मकरसंक्रांती आली की हेच वाक्य सारे उच्चारतात. या मागे कारणही आहे. गोड बोलण्याने कठीण कामेही सहज होऊ शकतात. गोड बोलणे म्हणजे एखाद्याचे लांगूलचालन करणे एवढा मर्यादित अर्थ नव्हे. तर किरकोळ कारणांवरून रागावण्यापेक्षा सामंजस्याने एकमेकांना समजून घेणे हा व्यापक दृष्टिकोन आहे. एखाद्याने सोपविलेले किंवा आपण स्वत:हून स्वीकारलेले कोणतेही काम पूर्ण सकारात्मक विचाराने केले पाहिजे. कामाची सुरुवात सकारात्मक भावनेने केल्यास अर्धे काम तर अगदी सुरुवातीलाच फत्ते झाले, असे समजा. प्रशासक म्हणून काम करताना आणि एक व्यक्ती म्हणूनही जगताना आपण उत्तमच असले पाहिजे. कामाचा ताण अपरिहार्य असतोच. पण ताण बाजूला सारुन पुढे जायचेच असते. त्यासाठी जबाबदारीचे विकेंद्रीकरण सामंजस्याने केले पाहिजे. रागाचा आपल्या जीवनावर अत्यंत वाईट परिणाम होतो. प्रत्येकात काही तरी चांगल्याबाबी असतात. त्या निदर्शनास आणून दिल्यास कामाचा उत्साह वाढतो. त्यासाठी संवाद गोडीगुलाबीचाच असावा.- डॉ. राजेश देशमुखजिल्हाधिकारी, यवतमाळराग येणे, चिडचिड यामुळे मनावर, शरीरावर विपरित परिणाम होतो. त्यातून सामाजिक सलोखा बिघडून नकारात्मक वातावरण पसरते. त्यामुळे संक्रांतीनिमित्त का होईना ‘गुड बोला, गोड बोला’ ही मोहीम ‘लोकमत’ राबवित आहे. त्यात मान्यवरांच्या सकारात्मक विचारांचा सिंहाचा वाटा आहे.
सकारात्मक वागा, अन् आयुष्यात यशस्वी व्हा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 9:54 PM
तिळ गूळ घ्या, गोडगोड बोला. मकरसंक्रांती आली की हेच वाक्य सारे उच्चारतात. या मागे कारणही आहे. गोड बोलण्याने कठीण कामेही सहज होऊ शकतात. गोड बोलणे म्हणजे एखाद्याचे लांगूलचालन करणे एवढा मर्यादित अर्थ नव्हे. तर किरकोळ कारणांवरून रागावण्यापेक्षा सामंजस्याने एकमेकांना समजून घेणे हा व्यापक दृष्टिकोन आहे.
ठळक मुद्देजिल्हाधिकारी राजेश देशमुख यांचा मंत्र