लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पोलीस ठाण्याचा कारभार हा बीट अंमलदारच यशस्वीपणे सांभाळतो. कायदा व सुव्यवस्थेची बुज राखण्याची खरी जबाबदारी बीट अंमलदारावर आहे. प्रत्येकाने आपल्या बीटमधील बारीकसारिक घडामोडींवर लक्ष केंद्रीत करुन प्रतिबंध करावा असे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांनी दिले. सोमवारी पोलीस मुख्यालयात यवतमाळ उपविभागातील तपासी अंमलदारांचा दरबार घेतला, त्यावेळी बोलत होते.जमादार आपल्या बीटमध्ये कशा पद्धतीने काम करतो यावरच होणाऱ्या गुन्ह्यांचे स्वरूप अवलंबून असते. पोलीस ठाण्यांचा खरा कारभार तपासी अंमलदार व बीट जमादार यांच्याकडून चालविला जातो. त्यांच्यापुढे असणाºया अडचणी जाणून घेण्यासाठी पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांनी दरबार घेतला. यावेळी प्रत्येक बीट अंमलदाराला तुम्ही तुमच्या बीटमध्ये चांगली कामगिरी करा तेथे बाहेरच्या पथकाला हस्तक्षेप करण्यासाठी वाव ठेऊ नका, कुणाच्या दबावात अवैध धंदे सुरू असले तरी त्याचे उत्तर बीट अंमलदाराला द्यावे लागेल. त्यामुळे यापुढे प्रत्येकाने स्वत:ची जबाबदारी ओळखून काम करा, अवैध धंदे, गुन्हेगार यांच्याशी हितसंबंध जोपासू नका, प्रलंबित गुन्हे तत्काळ निकाली काढा जेणे करून बीटमधील घडामोडींवर लक्ष ठेवता येईल, असेही सांगितले.यावेळी अनेक अंमलदाराने आपल्या अडचणी मांडल्या. ठाण्यात मुद्देमाल ठेवण्यासाठी जागा नसल्याचे सांगितले. शासकीय निवासस्थानाची अवस्था बिकट आहे. त्या बाबतच्या अडचणी मांडल्या. पोलीस ठाण्याच्या जागेबाबतही पाठपुरावा करून त्या जागा कागदोपत्री नावावर करून घेण्याचे निर्देशही पोलीस अधीक्षकांनी यावेळी दिले. तीन तास चाललेल्या दरबारात पहिल्यांदा बीट जमादाराला वरिष्ठ अधिकाºयाकडून पाठबळ मिळाल्याची भावना व्यक्त झाली. यवतमाळचा दरबार संपल्यानंतर पोलीस अधीक्षक दारव्हा उपविभागातील दरबार घेण्यासाठी रवाना झाले. यापूर्वी पांढरकवडा, वणीतही त्यांनी दरबार घेऊन अशाच सूचना दिल्या होत्या.कुणाच्या दबावात येऊन नोकरी धोक्यात घालू नकाकुठल्याही प्रकारची तक्रार, एसीबी पथकाची कारवाई झालेल्या कर्मचारी-अधिकाºयाला खात्यात यापुढे ठेवले जाणार नाही. पुसद सारखे प्रकार यापुढे खपवून घेतले जाणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारीचे आपले कर्तव्य बजवावे, कुणाचा दबाव स्वीकारून स्वत:ची नोकरी धोक्यात घालू नये अशा स्पष्ट सूचना दिल्या.
बीट अंमलदारच राखू शकतो सुव्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2020 5:00 AM
प्रत्येकाने आपल्या बीटमधील बारीकसारिक घडामोडींवर लक्ष केंद्रीत करुन प्रतिबंध करावा असे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांनी दिले. सोमवारी पोलीस मुख्यालयात यवतमाळ उपविभागातील तपासी अंमलदारांचा दरबार घेतला, त्यावेळी बोलत होते.
ठळक मुद्देजिल्हा पोलीस अधीक्षक : मुख्यालयातील दरबारात दिल्या टिप्स्