शंभर लाभार्थ्यांच्या सह्यांचे तहसीलदारांना निवेदन सादर
फोटो
महागाव : खोडसाळ तक्रारी करून राशन वाटपात व्यत्यय आणण्यात येत असल्याचा आरोप करीत तालुक्यातील इजनी येथील कूपनधारक शुक्रवारी तहसील कार्यालयावर धडकले. रास्त भाव परवानाधारकाच्या समर्थनार्थ त्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले.
इजनी येथील काही जण बिनबुडाचे आरोप व तक्रारी करून गावकऱ्यांना नाहक त्रास देत आहेत. रास्त भाव दुकानाचा परवाना त्रिमूर्ती बचत गटाला देण्यात आला. सुरुवातीपासून या बचत गटाकडील दुकानाची एकही तक्रार नाही; मात्र गावातील रहिवासी नसलेल्या महागाव येथील एका व्यक्तीने केवळ त्रास देण्याच्या उद्देशाने खोडसाळपणे तक्रार केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला.
गावकऱ्यांनी तहसीलदार विश्वंभर राणे यांच्याकडे चौकशी करून खोटी तक्रार देणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष दिगंबर पाचकोरे, प्रवीण वानखेडे, सुनील राठोड, संदीप रावते, श्रीराम राठोड, शंकर पवार, दिलीप जाधव, विजय जाधव, अशोक राठोड, नितीन पवार, पुष्पा आडे यांच्यासह गावकरी उपस्थित होते. निवेदनावर किमान १०० ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
170921\img_20210917_134645.jpg
प्र.तहसीलदार विश्वंभर राणे यांना निवेदन सादर करताना महागाव तालुक्यातील इजणी येथील नागरिक