लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : वन विभागाने विकसित केलेल्या येथील श्रीकृष्ण टेकडीला गुरुवारी दुपारी १२ वाजता भीषण आग लागली. या आगीत रोपवाटिकेसह मौल्यवान वनसंपदा जळून नष्ट झाली. तब्बल तीन तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.पांढरकवडा शहरानजीक प्राचीन श्रीकृष्ण टेकडीवर वन विभागाने कोट्यवधी रुपये खर्च करून पर्यटनस्थळ विकसित केले आहे. ५० हेक्टर परिसरात विविध वृक्षांची लागवड आली. या ठिकाणी मुलांचे खेळण्याचे साहित्य, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यासह पर्यटकांंना बसण्यासाठी बाकडे लावण्यात आले. गत काही दिवसांपासून या परिसरात पर्यटकांची मोठी वर्दळ वाढली होती. वृक्षराजीने हिरव्यागार झालेल्या आणि पशुपक्षांच्या संचाराने हा परिसर समृद्ध झाला होता. मात्र गुरुवारी दुपारी टेकडीच्या पूर्व दिशेला असलेल्या शेताकडून धुराचे लोट दिसले. आग लागल्याचे लक्षात आले. तत्काळ वन अधिकाऱ्यांसह पांढरकवडा नगरपरिषदेच्या अग्नीशमन दलाला सूचना देण्यात आली.वेगाने वाहणारा वारा आणि ताळपते उन्ह यामुळे आगीने रौद्ररुप धारण केले. उंचसखल भाग असल्याने आग विझवितानाही अडचणी येत होत्या. या आगीत मौल्यवान वनसंपदेसह असलेल्या गवताच्या झोपड्या व विविध साहित्य भस्मसात झाले. आगीची माहिती मिळताच पांढरकवडाच्या उपवनसंरक्षक के.एम. अभर्णा, वनपरिक्षेत्र अधिकारी संगीता कोकणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच वन विभागाचे विविध कर्मचारीही धावून आले. आग विझविण्याचे आटोकाट प्रयत्न सुरु होते. आग विझविण्यासाठी निसर्गमित्र मंचच्या ३० ते ४० सदस्यांनी परिश्रम घेतले. ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र कळू शकले नाही.मोठा अनर्थ टळलाश्रीकृष्ण टेकडीच्या बाजूला मांगुर्डा रोडवर आशापुरा जिनिंग आहे. या जिनिंगमध्ये शेकडो क्ंिवटल कापूस ठेवलेला आहे. आग आटोक्यात आली नसती तर या जिनिंगपर्यंत पोहोचली असती. वेळीच आग आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. तसेच या पर्यटनस्थळावर पर्यटकांच्या सोईसाठी सिमेंट रस्ते तयार करण्यात आले. या सिमेंट रस्त्यामुळे फायर बॉर्र्डर तयार झाल्याने आगीवर नियंत्रण मिळविणे शक्य झाले.
पांढरकवडाचे वन पर्यटन स्थळ आगीत बेचिराख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2018 9:54 PM
वन विभागाने विकसित केलेल्या येथील श्रीकृष्ण टेकडीला गुरुवारी दुपारी १२ वाजता भीषण आग लागली. या आगीत रोपवाटिकेसह मौल्यवान वनसंपदा जळून नष्ट झाली. तब्बल तीन तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.
ठळक मुद्देश्रीकृष्ण टेकडी : मौल्यवान वनसंपदा नष्ट, तीन तासानंतर नियंत्रण