लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : वीज वितरण कंपनीचे शहरातील अनेक रोहित्र उघड्या अवस्थेत आहे. या रोहित्राजवळून मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने स्पर्श होवून एखाद्याचा जीव जाण्याचा धोका वाढला आहे. विशेष म्हणजे, याबाबत सजग नागरिकांनी तक्रारी केल्यानंतरही वीज वितरणचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहे.शहरातील रोहित्रावरील उघड्या पेट्या बंद करणे, फ्युजला ग्रीप लावणे याबाबत वीज वितरण कंपनीला वारंवार नागरिकांनी निवेदन दिले. दारव्हा ते कारंजा रोडवरील श्री शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालयाजवळ रोहीत्र आहे. ते उघड्या अवस्थेत असल्याने जीवघेणे ठरत आहे. विविध नगरातील रोहित्रावरील पेट्या उघड्या असून वाटसरूंना मृत्यूचे निमंत्रण देत आहे. श्री शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालयातील हजारो विद्यार्थी या रोहित्राजवळूनच ये-जा करतात. तसेच बँक आॅफ इंडिया, स्टेट बँकेकडे जाणारा मार्ग, तलाठी कार्यालय, पोस्ट आॅफिस आदी भागात रोहीत्र असून ते उघडे आहे. या रोहित्राजवळच प्रवासी थांबा असल्यामुळे तेथे नेहमी गर्दी असते. नजर चुकीने रोहित्राच्या पेटीतील तारांना स्पर्श झाल्यास मृत्यूची दाट शक्यता आहे.रोहित्राच्या पेट्या बंद करण्याची मागणी वारंवार करण्यात आली. शिवाजी विद्यालयाजवळील पेटी तातडीने बंद करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. यासंदर्भात वीज वितरणला निवेदन देण्यात आले. यावेळी भारत मुक्ती मोर्चाचे बिमोद मुधाने, डॉ.बी.के. पंडित, सोमेश्वर पंचबुद्धे, विजय दुधे, राजेंद्र दुधे, पंजाबराव गावंडे, अॅड.आर.एल. कठाणे, हेमांशू जाधव, योगेश राठोड, शंतनू देशकरी, मोहन गावंडे, गोपाल पवार यासह विद्यार्थी उपस्थित होते.
उघडे रोहित्र ठरताहेत जीवघेणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 9:55 PM
वीज वितरण कंपनीचे शहरातील अनेक रोहित्र उघड्या अवस्थेत आहे. या रोहित्राजवळून मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने स्पर्श होवून एखाद्याचा जीव जाण्याचा धोका वाढला आहे.
ठळक मुद्देदारव्हा येथील समस्या : तक्रारींकडे वीज वितरणचा कानाडोळा