महागाव : कृषी वीजबिल सवलत योजना २०२० अंतर्गत तालुक्यातील दीडशे शेतकऱ्यांनी वीजबिल रकमेच्या ३० टक्के रक्कम महावितरण कंपनीला अदा करून योजनेचा लाभ घेतला.
तालुक्यातील घाणमुख येथील नामदेव जेसा राठोड, जनाबाई परसराम चव्हाण, गुणवंतराव शंकर इंगळे, देवराव सटवा रणमले, मोहन मेरसिंग पवार, रामराव बाजीराव इंगळे आदी शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने कृषी वीजबिल व चालू वीजबिलासह रुपये २४ हजारांचा भरणा करून कृषी वीजबिल सवलत योजनेचा लाभ घेतला.
या योजनेमध्ये सप्टेंबर २०१५पर्यंत शेतकऱ्यांना कृषिपंपाचे पूर्ण व्याज व विलंब आकार माफ आहे. सप्टेंबर २०१५ नंतरचे विलंब आकारसुद्धा संपूर्णपणे माफ आहे. त्यानंतर येणाऱ्या मूळ रकमेमधूनसुद्धा ५० टक्के रक्कम शेतकऱ्यांना माफ होत आहे. नियमित वीज ग्राहकांकडून फेब्रुवारी २०२१ मध्ये तब्बल दोन कोटी ५० लाख रुपये वसुली केल्याची माहिती उपविभागीय अभियंता विनोद चव्हाण यांनी दिली.