आॅनलाईन लोकमतहरसूल : बीडी सिगारेट ओढाल तर तुमच्या श्वास नलिकेत धूर शिरेल. त्यातील कार्बनचे कण तुमची फुप्फुसे, श्वास नलिकेला चिपकून बसतील. जीव गुदमरला जाईल. श्वासागणिक वेदना होतील. खोकला, दमा, कन्सर अशा आजारांना सुरवात होवून मृत्यू होईल. अशा जीवघेण्या व्यसनांना टाळा हा संदेश मोठ्यांना देण्याचा चिमुकला प्रयत्न डेहणी येथील सानिया सबा हिने केला आहे.तूपटाकळी येथील तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत तिने सामाजिक प्रबोधनाचा स्टॉल लावला आहे.सानिया आणि मुस्कान परवीन या डेहणी येथील उर्दू शाळेच्या विद्याथीर्नी. त्या मुख्याध्यापक महंमद तारिक यांचे सोबत या प्रदर्शनीत सहभागी झाल्या आहेत. बीडी सिगारेट ओढल्याने शरीरात जाणारा धूर, श्वास नलिकेत आणि फुप्फुसांमध्ये कसा कोंबला जातो हे प्रत्यक्ष दाखविणारा प्रयोग त्यांनी प्रदर्शनीत मांडला आहे. सिगारेट ओढल्याने शरीरातील अंतर्गत अवयवांना कसा धोका निर्माण होवू शकतो याचे हे जिवंत मॉडेल आपल्या शिक्षकांच्या मदतीने उभारले आहे. त्यासाठी वापरलेल्या सर्व वस्तू टाकावू आहेत हे विशेष! रिकामी प्लास्टिकची मोठी बॉटल, छोटी रबरी नळी, काही जुने कापड, थोडे पाणी आणि एक छोटा ट्रे वापरून त्या आपल्या प्रयोगाचे सादारीकरण करतात. या दोघी व्यसन सोडण्याची विनंती प्रत्यक्षदर्शिना करतात.हा प्रयोग प्रदर्शनीपुरता मर्यादित न ठेवता आठवडी बाजार, जत्रा, सामाजिक कार्यक्रम आणि सार्वजनिक ठिकाणी ठेवून लोकांमध्ये व्यसन विषयक जनजागृतीचा आम्ही संकल्प केला आहे.-महंमद तारिक, मुख्याध्यापकउर्दू शाळा डेहणी.
खबरदार, सिगारेट ओढाल तर...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2017 9:54 PM
बीडी सिगारेट ओढाल तर तुमच्या श्वास नलिकेत धूर शिरेल. त्यातील कार्बनचे कण तुमची फुप्फुसे, श्वास नलिकेला चिपकून बसतील.
ठळक मुद्देचिमुकल्यांचा मोठ्यांना सल्ला : तूपटाकळी येथील तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन