शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

स्पर्धा परीक्षेत भरारी घेणारी भंडारीची शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 5:00 AM

भंडारी हे गाव म्हणजे केवळ पुसद तालुकाच नव्हे तर यवतमाळ जिल्ह्याच्याही शेवटच्या टोकावर वसलेले दुर्गम ठिकाण आहे. पूर्वी या शाळेत येण्यासाठी विद्यार्थीच नव्हे तर भरभक्कम पगार असलेले शिक्षकही तयार नव्हते. मात्र गेल्या काही वर्षात येथे आलेल्या उपक्रमशील शिक्षकांच्या चमूने शाळेचे रुपडे पालटून कीर्ती वाढविली आहे. त्यामुळे आता भंडारीसह परगावातील विद्यार्थीही या शाळेत आवडीने दाखल होत आहे.

ठळक मुद्देपुसद तालुक्यात वेगळी ओळख : निवासी सुसंस्कार शिबिर, मातृप्रबोधन कार्यशाळा, दरवर्षी नवोदयमध्ये यशस्वी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गोरगरिबांची खेड्यापाड्यात अभावग्रस्त जीवन जगणारी निरागस मुलेही स्पर्धेच्या युगात पुढे गेली पाहिजे, या निर्धाराने पुसद तालुक्यातील भंडारी येथील जिल्हा परिषद शाळा वेगळी वाटचाल करीत आहे. दैनंदिन अभ्यासक्रमासोबतच चक्क प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांकडूनच स्पर्धा परीक्षेची तयारी करवून घेण्याचा या शाळेचा पायंडा उपयुक्त ठरला आहे.भंडारी हे गाव म्हणजे केवळ पुसद तालुकाच नव्हे तर यवतमाळ जिल्ह्याच्याही शेवटच्या टोकावर वसलेले दुर्गम ठिकाण आहे. पूर्वी या शाळेत येण्यासाठी विद्यार्थीच नव्हे तर भरभक्कम पगार असलेले शिक्षकही तयार नव्हते. मात्र गेल्या काही वर्षात येथे आलेल्या उपक्रमशील शिक्षकांच्या चमूने शाळेचे रुपडे पालटून कीर्ती वाढविली आहे. त्यामुळे आता भंडारीसह परगावातील विद्यार्थीही या शाळेत आवडीने दाखल होत आहे.रोजमजुरीसाठी स्थलांतरित होणाऱ्या मजुरांच्या मुलांचे स्थलांतर रोखण्यात भंडारीच्या शाळेला यश मिळाले. या शाळेने चालविलेल्या हंगामी वसतिगृहाला चांगला प्रतिसाद आहे. जादा वर्ग घेऊन शाळेत विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेची मोफत तयारी करून घेतली जाते. उन्हाळी सुटीत निवासी स्वरूपाचे सुसंस्कार शिबिर घेतले जाते. यात विद्यार्थ्यांसह प्रौढ पालकही सहभागी होतात. नियमित पालकसभा आणि मातृप्रबोधन कार्यशाळा घेतली जाते. शालेय परिसर हिरवागार आणि गाव परिसरातही वृक्षारोपण व संवर्धन करणारी भंडारी जिल्हा परिषद शाळा आकर्षण ठरली आहे.गावकरी वाचनालय रुजविलेभंडारीच्या शाळेने लोकसहभाग मिळवून गावात चक्क गावकरी वाचनालय सुरू केले. त्यामुळे विद्यार्थ्यांसह गावातील रोजमजुरी करणाºया पालकांनाही वाचनाची सवय लागली आहे.भंडारीत सुरू झालेला स्नेहभोजनाचा उपक्रम नंतर शासनाने राज्यभरात लागू केला, हे विशेष. भंडारीत आजही या उपक्रमात मिष्ठान्नासह पौष्टीक आहारही विद्यार्थ्यासह पालकांनाही दिला जातो. गरीब गरजू विद्यार्थ्यांना या शाळेतील शिक्षक स्वखर्चाने साहित्य पुरवितात.आमच्या एकूण पटापैकी ४६ टक्के मुले बाहेरगावची आहेत. वाहतुकीच्या साधनांचा अभाव असल्याने इच्छा असूनही परगावातील अनेक मुलांना भंडारीत येता येत नाही. प्रगती दिसली तर पालक माध्यम व इतर गोष्टी पाहत नाही. पालकांचे समाधान आणि बालकांचा सर्वांगीण विकास हेच आमच्या शाळेचे ध्येय आहे.- गणेश एस. चव्हाण, मुख्याध्यापकआम्हा गावकऱ्यांना आमच्या शाळेचा अभिमान आहे. शिक्षकांच्या मेहनतीचे फळ म्हणजे यंदा पाच विद्यार्थी नवोदयसाठी पात्र ठरले.- गजानन इंगोले, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीआमच्या शिक्षकांनी गावातील सामाजिक कार्यातही मोठा सहभाग घेतला. गणेश चव्हाण यांच्यामुळे शाळेचा कायापालट झाला.- मनोहर जाधव,पालक

टॅग्स :Schoolशाळा