शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

‘भीम पहाट’ने विचारांच्या उत्सवाला सुरांचा साज

By admin | Published: April 15, 2017 12:14 AM

‘उद्धरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे’ अशी कृतार्थतेची भावना जोजवीत भीमजयंतीची पहाट उगवली...

बाबासाहेबांना विनम्र अभिवादन : तोफांची सलामी, सर्वत्र निळे वातावरण यवतमाळ : ‘उद्धरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे’ अशी कृतार्थतेची भावना जोजवीत भीमजयंतीची पहाट उगवली अन् ‘भारत के संविधान को लिखना सब के बस की बात नही’ अशी दवंडी पिटवित अख्खा दिवस समतेच्या सुरांनी व्यापून उरला... भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त अख्ख्या यवतमाळ शहरावर जणू निळे नभ उतरले होते. शहराच्या कानाकोपऱ्यातील भीमभक्तांचा उत्साह बसस्थानक चौकातील बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ एकवटला होता. पुतळा परिसरातच आयोजित करण्यात आलेल्या ‘भीम पहाट’ कार्यक्रमाने विचारांच्या उत्सवाला सुरांचा साज चढविला. गायकांनी भीमगीते सादर करून बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी अनेकांच्या डोळ्यांच्या कडा आपसूकच ओलावल्या होत्या. पांढरेशुभ्र वस्त्र परिधान केलेले महिला-पुरुष शिस्तीत रांगेत उभे राहून बाबासाहेबांच्या पुतळ्याचे दर्शन घेत होते. डोक्यावर निळे फेटे बांधलेल्या तरुणांनी लक्ष वेधून घेतले. हजारो अनुयायांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून बाबासाहेबांचा जयघोष केला. बसस्थानक चौकात पहाटेपासूनच डॉ. बाबासाहेबांच्या अनुयायांनी एकच गर्दी केली होती. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य विक्रीकरिता उपलब्ध होते. विविध कॅसेट, स्टिकर, झेंडे आणि टोप्यांचाही यात समावेश होता. भीम जयंतीच्या अनुषंगाने पहाटे शहरातून स्कूटर रॅली काढण्यात आली. रॅलीत युवक आणि युवतींचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. निळे फेटे परिधान केलेले युवक, युवती लक्षवेधी दिसत होते. सकाळी निघालेल्या शोभायात्रेचे स्वागत करण्यासाठी शहरातील विविध चौकात स्टॉल उभारण्यात आले. बसस्थानक चौकात उमरसरामधील जय भीम स्टॉलने भोजनाची व्यवस्था केली. मेडिकल कॉलेज चौकात ‘एकच साहेब, बाबासाहेब’ मंडळाने भोजनाचा स्टॉल लावला होता. लोहारा परिसरातील सानेगुरूजी नगरात अत्यंत उत्साहात भीम जयंती साजरी करण्यात आली. याशिवाय तहसील चौक, नेताजी चौक, वडगाव, लोहारा, वाघापूर, पिंपळगावमध्ये विविध कार्यक्रम घेण्यात आले. शहराच्या विविध भागांमध्ये आकर्षक रांषणाई करण्यात आली. ठिकठिकाणी पताका आणि ध्वज लावण्यात आले. विविध भागातून रॅली काढण्यात आली. (शहर वार्ताहर)