लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भिमा कोरेगाव येथील संग्रामाला १ जानेवारी २०१८ रोजी दोनशे वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त यवतमाळात भिमा कोरेगाव शौर्यदिन द्विशताब्दी स्मृती समारोह आयोजित करण्यात आला आहे. त्याअंतर्गत ३, ४ आणि ५ जानेवारी रोजी समता मैदानावर सायंकाळी व्याख्यानासह सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती रविवारी आयोजकांतर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आली.संविधानिक विचार मंच व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक कृती समिती तथा आंबेडकरी कवी-गायक बहुउद्देशीय परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हा समारोह होत आहे. यात ३ जानेवारीला सायंकाळी ‘भिमा कोरेगाव संग्राम इतिहास’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. ‘कोर्ट’ चित्रपटाचे मुख्य अभिनेते व आंबेडकरी विचारवंत विरा साथीदार हे व्याख्याते आहेत. उद्घाटन धम्मभूमी मासिक पत्रिकेचे संपादक विजय डांगे यांच्या हस्ते होईल. तसेच नागपूर येथील परमानंद भारती आणि बाभ भीमराव चित्रपटाच्या निर्मात्या निशाताई भगत यांच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात येणार आहे.४ जानेवारीला ‘बौद्धांच्या समरगाथा’ या विषयावर मुंबईचे विवेक मोरे यांच्या व्याख्यान होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश भस्मे राहतील. प्रमुख अतिथी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला उपस्थित राहणार आहेत. तर सांस्कृतिक कार्यक्रमात मुंबईचे प्रसिद्ध गायक अश्विनी राजगुरू, स्थानिक कलावंत प्रबोधनकार मानकर बाबू कव्वाल व मदन वरघट कव्वाली सादर करणार आहेत.५ जानेवारीला ‘आंबेडकरी आंदोलनाची दिशा’ या विषयावर दिल्लीचे उमेदसिंह गौतम यांचे मार्गदर्शन होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड. रामदास राऊत असून प्रमुख अतिथी म्हणून मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे, समता पर्वाचे अध्यक्ष किशोर भगत उपस्थित राहणार आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमात गजानन कांबळे, स्पंदन ग्रूप क्रांती गीते सादर करतील. आवाज भीम लेकरांचा या गीत गायन स्पर्धेची अंतिम फेरी होईल. तसेच प्रकाश खरतडे ‘मी भीमाचा दिवाना’ ही एकपात्री नाटिका सादर करणार आहेत.पत्रकार परिषदेला के. एस. नाईक, अश्विंद खरतडे, विजय डांगे, रवी श्रीरामे, माया गजभिये, राहुल पाते, विष्णू भितकर, रमेश जीवने, दत्तात्रय सूर्यवंशी, मनोज वाघमारे, मनोज हुमणे, मुकुंद दारुंडे, सुधाकर धोंगडे, पवन इंगोले, हरिदास मेश्राम, जितेंद्र ढानके, सुनिल बन्सोड, आनंद भगत, अक्षय खोब्रागडे, सिद्धार्थ भवरे, शैलेश उके, उमेश मोहोड, मदन वरघट, वासुदेव मानकर, नामदेव स्थूल, प्रमोदिनी रामटेके, रविता भोवते, स्नेहल नगराळे, सुनंदा राऊत आदी उपस्थित होते.दररोज गीत गायन स्पर्धाभिमा कोरेगाव शौर्य दिन द्विशताब्दी समारोहात दररोज गीत गायन स्पर्धा रंगणार आहे. ३, ४ आणि ५ जानेवारीला रात्री बुद्ध, फुले, आंबेडकर, छत्रपती शिवाजी, आई सावित्री, आई रमाई यांच्या जीवनावरील गीते यात सादर होणार आहेत. अंतिम फेरीत विजेत्यांना बक्षीस वितरण केले जाणार आहे. तसेच भारतीय संविधानावर आधारित प्रश्नपत्रिका स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचाही यावेळी गौरव केला जाणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
भीमा कोरेगाव शौर्यदिन स्मृती समारोह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 11:00 PM
भिमा कोरेगाव येथील संग्रामाला १ जानेवारी २०१८ रोजी दोनशे वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त यवतमाळात भिमा कोरेगाव शौर्यदिन द्विशताब्दी स्मृती समारोह आयोजित करण्यात आला आहे.
ठळक मुद्देव्याख्यान व सांस्कृतिक कार्यक्रम : कलावंत आणि गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव