शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

गोरक्षणासाठी भीमरावची धडपड

By admin | Published: May 27, 2016 2:14 AM

शासन गोरक्षणासाठी विविध प्रयत्न करीत आहे. या माध्यमातून गोरक्षणासाठी निधीही उपलब्ध करून दिला जातो.

दीडशे गायींचे पोषण : स्वखर्चातून चालवितात उपक्रमपुसद : शासन गोरक्षणासाठी विविध प्रयत्न करीत आहे. या माध्यमातून गोरक्षणासाठी निधीही उपलब्ध करून दिला जातो. परंतु पुसद तालुक्यातील सत्तरमाळ येथील भीमराव जाधव यांचा गोरक्षणासाठी एकाकी लढा सुरू आहे. स्वखर्चातून दीडशे गायींचे पालनपोषण करीत असून, दुष्काळी परिस्थितीतही जनावरांची योग्य काळजी घेतली जाते. पुसद तालुक्यातील सत्तरमाळ येथे संत सेवालाल महाराज यांच्यापासून प्रेरणा घेऊन २०१३ साली गोरक्षणची स्थापना करण्यात आली. भीमराव लक्ष्मणराव जाधव यांनी दोन गायींपासून गोरक्षणाला प्रारंभ केला. संत सेवादास महाराजांचे परमभक्त असलेल्या भीमराव जाधव यांच्या या गोरक्षणात आता दीडशे गाई आहेत. दुष्काळी परिस्थितीत एवढ्या मोठ्या गार्इंचे पालनपोषण करताना मोठी कसरत करावी लागते. गार्इंची आणि वासरांची काळजी ते मुलाप्रमाणे घेतात. स्वत:च्या शेतातच मोठा गोठा बांधला असून, घरीसुद्धा शेड बांधले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी विहिरीवरून पाईप टाकून हौद बांधला आहे. भीमराव स्वत:च गार्इंना जंगलात चारायला घेऊन जातात. त्यांच्या या गोरक्षणात आता २५ वासरे आहेत. त्यांचे विशेष संगोपन केले जाते. आतापर्यंत शासनाने कोणतीही मदत गोरक्षणासाठी दिली नाही. सर्व खर्च स्वत:च करीत आहेत. दुष्काळी परिस्थितीत या गोरक्षणाला मदत करावी अशी माणगी माजी सरपंच सखाराम पंडीत, उपसरपंच देवानंद पंडीत, पोलीस पाटील भाऊराव जाधव, भाऊराव राठोड, बाबूराव राठोड, सुका जाधव यांनी केली आहे. (प्रतिनिधी)