दिग्रस : तालुक्यातील विविध विकास कामांचे सामूहिक भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा शनिवारी पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत पार पडला.स्थानिक बा.बु. कला, ना.भ. वाणिज्य, बा.पा. विज्ञान महाविद्यालयाच्या प्रांगणात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी खासदार भावना गवळी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले, सार्वजनिक बांधकामाचे उपविभागीय अभियंता आर.एम. चव्हाण, तहसीलदार नितीन देवरे, पंचायत समिती सभापती संगीता राठोड, वन विभागाचे संदीप गिरी, कृषी विभागाचे अर्जून जाधव उपस्थित होते.नागरिकांना वीज, पाणी, पांदण रस्ते, आरोग्यसेवा आदी सुविधांवर भर देण्यासोबत दीर्घकालीन उपाययोजना करण्यावर युती शासनाने भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून तालुक्यातील विकास कामांना प्रारंभ करण्यात आला आहे. अरुणावतीवरील मत्स्यबीज प्रक्रिया केंद्र, नांदगव्हाण धरणाचे पुनरुज्जीवन, पाणी अडवा-पाणी जिरवा, बळीराजा चेतना अभियान, नदीजोड प्रकल्प, डोहनिर्मिती आदी कामे नियोजित असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला एन.आर. वानखेडे, माजी नगराध्यक्ष रवींद्र अरगडे, जावेद पहेलवान, सुधीर देशमुख, बापू देशमुख यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. यशस्वीतेसाठी तहसीलदार नितीन देवरे यांच्या मार्गदर्शनात प्रकाश खाटीक, रवी तुपसुंदरे, प्रशांत मुक्कावार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय धोत्रे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय अभियंता राजू चव्हाण, महेश मातुलकर, श्रीकांत राठोड, शशिकांत महामुने यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)
दिग्रस येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन
By admin | Published: May 24, 2016 12:15 AM