शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
3
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
4
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
5
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
6
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
7
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
9
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
10
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
11
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
12
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
13
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
14
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
16
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
17
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
18
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
19
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

प्रकाशच्या जीवाचा सौदा दोन लाखांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 9:48 PM

प्राणघातक हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या प्रकाश आत्राम या युवकाच्या खुनाचे प्रकरण दडपण्यासाठी दोन लाखांत सौदा झाला होता.

ठळक मुद्देडिलिंग फिस्कटल्याने पोलिसांत धाव : पांढरकवडा ठाण्यात खुनाचा गुन्हा

सुदाम दारव्हणकर ।लोकमत न्यूज नेटवर्करुंझा : प्राणघातक हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या प्रकाश आत्राम या युवकाच्या खुनाचे प्रकरण दडपण्यासाठी दोन लाखांत सौदा झाला होता. परंतु हे डिलिंग अर्ध्यातच फिस्कटल्याने प्रकरणाच्या सुमारे दीड-दोन महिन्यानंतर पांढरकवडा पोलीस ठाण्यात धाव घेण्यात आली. या प्रकरणी हल्ला करणाºया टेकाम पिता-पुत्रांविरुद्ध शुक्रवारी रात्री खुनाचा गुन्हा नोंदविला गेला.पांढरकवडा तालुक्याच्या झोटींगधरा कोलाम पोडावरील हे प्रकरण आहे. २९ सप्टेंबर २०१७ रोजी सकाळी प्रकाश आत्राम (३३) या युवकावर गावातीलच टेकाम पिता-पुत्रांनी प्राणघातक हल्ला केला. उपचारादरम्यान ७ आॅक्टोबरला त्याचा मृत्यू झाला. तर घटनेच्या सुमारे दोन महिन्यानंतर ९ नोव्हेंबर रोजी या प्रकरणात मृत प्रकाशचा पिता आनंदराव आत्राम यांनी पांढरकवडा पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवून या प्रकरणाचे बिंग फोडले. शुक्रवारी पोलिसांनी दंडाधिकाºयांच्या उपस्थितीत प्रकाशचा जमिनीत पुरलेला मृतदेह बाहेर काढून जागीच उत्तरीय तपासणी केली. त्यानंतर नंदलाल टेकाम व त्याच्या दोन मुलांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. हे तिघेही बापलेक फरार आहे. पांढरकवडाचे एसडीपीओ अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार असलम खॉ पठाण फरार आरोपींच्या मागावर आहेत.घटनेच्या दोन महिन्यानंतर पोलिसात फिर्याद नोंदविण्यामागील कारणांचा शोध घेतला असता या प्रकरणातील सौदेबाजी उघड झाली. खुद्द पोलिसांनीही त्याला दुजोरा दिला ंआहे.पोटात सळाख खुपसल्याचा देखावाप्रकाशवरील हल्ल्याचे प्रकरण पोलिसांपर्यंत नेऊ नये म्हणून दोन लाखांचे डिलिंग झाले होते. त्याकरिता प्रकाश पडल्याने त्याच्या पोटात लोखंडी सळाख खुपसल्याचा देखावाही निर्माण करण्यात आला होता. या डिलिंगनुसार, त्यातील दहा हजार रुपये औषधोपचारासाठी तातडीने तर ३० हजार रुपये नंतर दिले गेले. दोन लाखांची ही रक्कम सन २०२० पर्यंत अर्थात पुढील तीन वर्षात टप्प्याटप्प्याने देण्याचे ठरले. या काळात ही रक्कम दिली न गेल्यास त्या मोबदल्यात शेत नावावर करून देण्याचेही ठरले.मोहदा येथील चौघांची मध्यस्थीया डिलिंगसाठी मोहदा गावातील चौघांनी महत्वाची भूमिका वठविली. त्यातील एक जण लोकप्रतिनिधी असल्याचे सांगितले जाते. त्यांनी हे डिलिंग कायदेशीररीत्या रेकॉर्डवरही घेतल्याची चर्चा आहे. मात्र ४० हजार दिल्यानंतर धमक्या मिळाल्याने व उर्वरित पैसे मिळण्याची चिन्हे नसल्याने प्रकरण पोलिसात पोहोचल्याचे बोलले जाते. या प्रकरणाच्या खोलात गेल्यास बरेच काही निष्पन्न होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.डॉक्टरांची सूचना, पोलिसांनी घेतली बयानेप्रकाश आत्राम याला २९ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता रुंझा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्याच्या शरीरावरील जखम ही शस्त्राने भोसकल्याची असल्याची नोंद घेऊन वैद्यकीय अधिकारी डॉ. उपाध्ये यांनी रुंझा पोलीस चौकीच्या जमादारांना सूचित केले. त्यानुसार, पोलिसांनी ंआत्राम कुटुंबातील सदस्यांची बयाने नोंदविली. मात्र त्यांनी आमची आपसात तडजोड होत असल्याचे सांगून फिर्याद देणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर अवघ्या दोन लाखांत प्र्रकाशच्या जीवाचा सौदा झाला. मात्र तो फिस्कटल्याने हे प्रकरण पोलिसात पोहोचले. तडजोडीसाठी पुढाकार घेणाºया मोहद्यातील ‘त्या’ चौघांचा पांढरकवडा पोलीस या प्रकरणात साक्षीदार म्हणून उपयोग करून घेणार असल्याचे बोलले जाते.