के.एस.वर्मा ।लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : आदिवासी बहुल, मागास आणि मानव विकास निर्देशांकात बऱ्याच खाली असलेल्या राळेगाव विधानसभा क्षेत्रात काही महत्वपूर्ण, मुलभूत समस्या भेडसावत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा या विधानसभा क्षेत्रात मागील तीन वर्षात तिनदा दौरा झाला. त्यांच्या प्रत्येक दौऱ्यानंतर या क्षेत्राला बरेच काही मिळालेले आहे. रविवार २४ डिसेंबरच्या चौथ्या दौऱ्यातही त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा नागरिकांना आहे. मुख्यमंत्री आणि केंद्रीय सडक परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने विविध केंद्रीय सिंचन प्रकल्पासह अनेक गोष्टी मिळतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.बेंबळा मुख्य कालव्याचे सिमेंट अस्तरीकरण केवळ ६५ किलोमीटर झाले आहे. तितकेच अद्यापही होणे बाकी आहे. त्यामुळे मारेगावपर्यंत यातून जाणारे पाणी ठिकठिकाणी मुरते. एकीकडे पाण्याचे नुकसान होते तर दुसरीकडे शेतजमिनीत ओल धरून राहते. याच बरोबर आष्टा उपवितरिकेसह विविध उपवितरिकांची कामे निकृष्ट झाली आहे. यात हजारों शेतकऱ्यांच्या शेतजमिनीत पाणी जाते. पाणी मुरते व शेतातील पिके नष्ट होत राहिली आहे. यातील दोषींवर कारवाई करण्याची व राहिलेली कामे पूर्णत्वास नेण्याची आवश्यकता आहे.राळेगाव तालुक्यात कळंब-राळेगाव-वडकी या ५० किलोमीटर क्षेत्रात आणि दुसरीकडे वडनेर (ता. हिंगणघाट) मार्गावर सिमेंट रस्ते बांधले जात आहे. आगामी काळात याक्षेत्रातून वेगवान वाहतूक सुरू होणार आहे. या रस्त्यांचा लाभ स्थानिक स्तरावर शेतकरी, नागरिक, बेरोजगारांना मिळावा यासाठी तीनही तालुक्यात एमआयडीसी स्थापन करण्याची नितांत गरज आहे. त्याचबरोबर कापसावर आधारित एखादा मोठा उद्योग या क्षेत्रात यावा याकरीता उत्सूक उद्योजकांना, कंपन्यांना प्रोत्साहित करण्याची गरज आहे.आगामी काळात शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करण्याचे शासनाचे प्रयत्न आहे. त्याकरिता शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांना खरीप, रब्बी, उन्हाळी कोणती पिके घ्यावी, कोणता भाजीपाला, फळझाडे लावावी याबाबत मार्गदर्शन करून त्यांचे जीवनमान उंचावण्यात प्रयत्न करू शकणाºया कृषी अधिकाऱ्याची याठिकाणी आवश्यकता आहे.पर्यटनाच्या सोयी उपलब्ध करून द्याबाभूळगाव तालुक्यातील बेंबळा धरण, कळंबचे चिंतामणी मंदिर, राळेगाव तालुक्यातील रावेरीचे सीता मंदिर याठिकाणी उच्च दर्जाच्या मूलभूत पर्यटन सोयी उपलब्ध करून देण्याची गरज आहे.वाघामुळे जीवन जगणे कठीणराळेगाव, कळंब, पांढरकवडा या परिसरातील १५-२० गावात वाघाने उच्छाद मांडला आहे. गावकऱ्यांचे जीवन जगणे कठीण झाले आहे. आतापर्यंत नऊ बळी या वाघाने घेतला आहे. वनविभागाचे प्रयत्न अद्यापही यशस्वी झालेले नाही. याकरीता आणखी उचित कारवाईची गरज नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
राळेगाव मतदारसंघाला ‘सीएम’कडून मोठ्या आशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 1:17 AM
आदिवासी बहुल, मागास आणि मानव विकास निर्देशांकात बºयाच खाली असलेल्या राळेगाव विधानसभा क्षेत्रात काही महत्वपूर्ण, मुलभूत समस्या भेडसावत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा या विधानसभा क्षेत्रात मागील तीन वर्षात तिनदा दौरा झाला.
ठळक मुद्देविविध समस्या : चौथा दौरा दिलासा देणारा ठरावा