शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
5
२५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
6
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
7
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
8
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
10
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
11
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
12
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
13
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
14
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
16
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
17
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
18
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
19
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?

खासगी ‘कन्सलटंट’वर कोट्यवधींची उधळपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 8:49 PM

‘कन्सलटंट’च्या नावाने चक्क खासगी अभियंत्यांची देखरेख आहे. त्यामुळे या कामांच्या गुणवत्ता व दर्जावर प्रश्नचिन्ह लावले जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागात रोड प्रोजेक्ट (आरपी) आणि विशेष प्रकल्प (एसपीडी) या दोन विभागांकडे काम नाही. तेथील अभियंते व यंत्रणेला कामाची प्रतीक्षा आहे.

ठळक मुद्देरस्ते-पुलांची गुणवत्ता निवृत्त अभियंत्यांच्या भरवश्यावर : सार्वजनिक बांधकामची दोन कार्यालये मात्र कामांविना

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सार्वजनिक बांधकाम खात्यात शेकडो कोटी रुपयांच्या रस्ते-पुलांची कामे सुरू आहेत. परंतु त्यावर शासकीय ऐवजी ‘कन्सलटंट’च्या नावाने चक्क खासगी अभियंत्यांची देखरेख आहे. त्यामुळे या कामांच्या गुणवत्ता व दर्जावर प्रश्नचिन्ह लावले जात आहे.सार्वजनिक बांधकाम विभागात रोड प्रोजेक्ट (आरपी) आणि विशेष प्रकल्प (एसपीडी) या दोन विभागांकडे काम नाही. तेथील अभियंते व यंत्रणेला कामाची प्रतीक्षा आहे. तर दुसरीकडे याच बांधकाम खात्यातील सेवानिवृत्त अभियंते कन्सलटन्सीमध्ये सक्रिय असून कोट्यवधी रुपयांच्या उलाढालीला हातभार लावत आहेत. अनेक स्थानिक अभियंत्यांनी कन्सलटन्सी स्थापन केली. बांधकाम खात्यातील दीर्घ सेवा, त्यातून कंत्राटदारांशी निर्माण झालेला सलोखा व संबंधांच्या बळावर कन्सलटन्सीसाठी कामे मिळविली जात आहे. अंदाजपत्रक बनविणे, सर्वेक्षण, देखभाल आदी कामे कन्सलटन्सीमधील खासगी व निवृत्त अभियंते करीत आहे. त्यांच्या स्तरावर अनेक तडजोडी केल्या जात असून त्यातूनच कामाची गुणवत्ता व दर्जा धाब्यावर बसविली जात आहे. खासगी अभियंते असल्याने त्यांच्यावर जबाबदारी व कारवाई काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.‘बीगबजेट’ प्रकल्पांमध्ये खासगी कन्सलटंट व अभियंत्यांची चलतीेशासनाच्या हॅम, सीआरएफ, सीएमजीएसवाय, एबीडी अशा सर्व मोठ्या प्रकल्पांमध्ये मुंबईतून कन्सलटन्सीची संकल्पना रुजविली गेली आहे. शासकीय अभियंते रिकामे बसले असताना कन्सलटन्टवर एवढी उधळपट्टी कशासाठी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अमरावती, वर्धा, नागपूरातून नेमणूकजिल्ह्यात स्थानिक ‘कन्सलटंट’ सोबतच अमरावती, वर्धा, नागपूर येथीलही ‘कन्सलटंट’ सक्रिय आहेत. बाहेरील ‘कन्सलटंट’ बोलावून त्यांना कामे दिली जात आहेत. त्यासाठी राजकीय दबाव वापरला जातोय. त्यातूनच मोठ्या कंपन्यांच्या नावाने कामे जारी केली जात आहेत. प्रत्यक्षात या कंपन्या अगदीच ज्युनिअर स्तरावरील अभियंत्यांना नेमतात. दहा जणांची आवश्यकता असताना एका-दोघावर काम भागवून खानापूर्ती केली जाते.उमरखेडमध्ये थेट औरंगाबादचे आर्किटेक्ट !उमरखेडमधील कामावर चक्क औरंगाबादचे आर्किटेक्ट, पाथ्रडदेवीच्या कामावर पुणे तर बाभूळगाव, पुसद येथे नागपूरच्या ‘कन्सलटंट’ची माणसे नेमली गेली आहेत. जिल्ह्यात हॅम अंतर्गत ४०० किलोमीटर लांबीची कामे सुरू आहेत. त्यात वेगवेगळे सहा ‘कन्सलटंट’ आहे. प्रत्येकाला किमान दहा अभियंते ठेवणे आवश्यक असताना प्रत्यक्षात दोन ते तीन अभियंते काम पाहत आहेत. त्यामुळे काम लांबणीवर जात असून गुणवत्ताही धोक्यात आली आहे.मुंबई, पुणे, बंगलोरचे ‘कन्सलटंट’ जिल्यातबहुतेक सर्व ‘कन्सलटंट’ मुंबई, पुणे, बंगलोरचे आहेत. त्यांचे प्रमुख अभियंते तर कधीच कुणाला दिसले नसल्याचे सांगितले जाते. हॅमचे डीपीआर करण्याकरिता थेट मुंबईवरून ‘कन्सलटंट’ची नेमणूक करण्यात आली, हे विशेष!प्रति किलोमीटर तब्बल अडीच लाख रुपये दर!कन्सलटंटला प्रति किलोमीटर अडीच लाख रुपये दर दिला गेला. स्थानिक पातळीवर एक लाख रुपये प्रति किलोमीटरने होणारे हे काम मुंबईत दीडपट अधिक रक्कम मोजून दिले गेले. येथील काही अभियंत्यांनीही अशाच कन्सलटन्सी उभ्या केल्या आहेत. सेवेत असताना वादग्रस्त ठरलेले अभियंतेही या कन्सलटन्सीमध्ये सेवा देत आहेत. बहुतांश कन्सलटन्सी बाहेरील असल्यातरी त्यांचे अभियंते मात्र स्थानिकच आहेत.