रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जंगलांच्या ऱ्हासाने पक्षांची किलबिलाट दुर्मिळ होत चालली आहे. यावर मात करण्यासाठी देऊळगाव वळसा गावात वनपर्यटन विकास योजनेतून पक्षी उद्यान साकारले जाणार आहे. त्यामध्ये पक्षांचे खाद्य निर्माण करणाऱ्या झाडांची खास लागवड करण्यात येणार आहे.दारव्हा तालुक्यातील देऊळगाव वळसा या ठिकाणी पक्षी उद्यान साकारण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. ५० हेक्टर क्षेत्रावर २०१६ मध्ये ‘बर्ड पॅराडाईज’मध्ये वृक्षारोपणाला प्रारंभ झाला. आतापर्यंत २५ हेक्टरवर वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. कम्पाउंड वॉल, चेनलींग फिनसिंग, अंतर्गत रस्ते, गेट, वॉच सेंटरची या ठिकाणी निर्मिती करण्यात आली आहे.दीड कोटी रूपयांच्या निधीतून हे पक्षी उद्यान उभे राहणार आहे. पक्षीप्रेमींना पक्षी न्याहाळण्यासाठी खास व्यवस्था असणार आहे. या ठिकाणी उंबर, वड, चेरी, बोरी, जांभूळ या झाडांची लागवड करण्यात आली आहे. अशाच पद्धतीच्या अन्य काही वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. ‘पक्षी थांब्याची झाड’ही राहणार आहे. यामुळे पक्षीप्रेमींना दुर्मिळ पक्ष्यांची छायाचित्रे टिपता येणार आहे. जिल्ह्यातील हे पहिलेच पक्षी उद्यान ठरणार आहे.‘अॅरोमा पार्क’मध्ये कॅन्सरवर मात करणाऱ्या वनस्पतीनेरच्या ‘अॅरोमा पार्क’मध्ये कॅन्सरवर मात करणारी वनस्पती पाहायला मिळणार आहे. यासोबतच सर्पगंधा, अडूळसा, हिरडा, त्रिफळाचूर्ण याही वनस्पती राहणार आहे. त्या वनस्पती समोर त्याचे नाव आणि त्याचा उपयोग लिहिलेला असणार आहे. यामुळे येणाऱ्या पिढीला आयुर्वेदिक वनस्पतीचे महत्व कळणार आहे.
सर्व जातीचे बांबूबांबू या वनस्पतीमध्ये अनेक प्रकार आढळतात. त्याची ओळख प्रत्येकाला व्हावी म्हणून देऊळगाव वळशात अशा सर्व जातीचे बांबू पाहायला मिळणार आहे.
देऊळगाव वळशात पक्षी उद्यान उभारण्याचे काम वेगात सुरू आहे. बहुतांश काम शेवटच्या टप्प्यात आहे. पक्षीप्रेमी आणि निसर्गप्रेमींसाठी हे उद्यान परवणी ठरणार आहे.- भानुदास पिंगळेउपमुख्य वनसंरक्षक, यवतमाळ