शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

किरायाच्या सायकलींवर निघे जयंती मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 22:09 IST

थो टाईमच अल्लग होता. तवा बाबासाहेबाच्या जयंतीले आशा मोटारसायकली नाई राहाच्या.. तवा लोकं सायकलीवर बसून मिरवणूक कहाडाचे. सायकलीबी किरायानं घ्याचे. दोघ मिळून येक सायकल राहाची. सायकलीलेस का नाई तं झंडे बांधून न्याचे.

ठळक मुद्देडॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती : ८० वर्षांच्या रेणुकाबाई यांनी जागविल्या यवतमाळातील परिवर्तनाच्या आठवणी

अविनाश साबापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : थो टाईमच अल्लग होता. तवा बाबासाहेबाच्या जयंतीले आशा मोटारसायकली नाई राहाच्या.. तवा लोकं सायकलीवर बसून मिरवणूक कहाडाचे. सायकलीबी किरायानं घ्याचे. दोघ मिळून येक सायकल राहाची. सायकलीलेस का नाई तं झंडे बांधून न्याचे. आता जमाना बदलला, लोकं बी हुशार झाले. जयंतीची मिरवणूक बी झोकात काहाडतेत... पाटीपुरा परिसरातील ८० वर्षीय रेणुकाबार्इंचे हे शब्द आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती रविवारी साजरी होत आहे. त्यानिमित्त यवतमाळातील आंबेडकरी समाजाच्या बदलत्या परिस्थितीविषयी साधलेला संवाद...यवतमाळातच जन्म आणि यवतमाळातच सासर असलेल्या रेणुका श्रावण गणवीर यांनी ८० वर्षांतील बाबासाहेबांच्या जयंती मिरवणुका पाहिल्या आहेत. एवढ्या वर्षातले बदल सांगताना त्या म्हणाल्या, मी पयले तलावफैलात राहो. तेथले मजूर गरीब आसन, पण बाबासाहेबाच्या जयंतीला लागन तेवढे पैसे द्याले सारे तयारस राहे. दोन-दोन महिन्यापयलेच वर्गण्या जमा कराले लागे. आताबी जयंतीसाठी पैसे खर्चाले कोणी मांग-पुढं पाहात नाई. आता करने सवरनेवाले पोरं लय हुशार झाले. मंडप मस्त करतेत. तवा निस्ता बँड राहे, आता डीजे लावतत. तलावफैलात येक आखाडा होता. सारे तिथंच जमे. पण ८० साली थो पडला. बाबासाहेबाच्या धोरणाच्यानंच तलावफैलातल्या मजुरायचे मस्त घरं झाले आता, पयले निस्त्या कौलाच्या झोपड्या होत्या. पण नुसते घरं नाई बदलले आता लोकं बदलले. पुस्तकं वाचाले लागले. नव्या पोराईले तं सबन समजाले लागलं. आसं करा, तसं करा म्हणून पोरंस आमाले सांगते....रेणुकाबाई गणवीर यांनी अशा विविध आठवणींमधून यवतमाळातील बाबासाहेबांच्या जयंती कार्यक्रमांच्या आठवणी जागविल्या.तवा पेपर नव्हते. बाया भारा आणाले जंगलात गेल्या का येकमेकीले बातम्या सांगे.. मस्त झालं वं बाबासाहेबाचं भाषण... - रेणुकाबाई गणवीरबाबासाहेब गेले, थ्याच वर्सी महा लगन झालं. बाबासाहेब गेले म्हणून यवतमाळात हे फोनावर फोन याले लागले होते. साऱ्यायची धांदल उडून गेल्ती. लगनात बयनीनं आंदन म्हणून आणलेल्या भांड्यावर तारीख हाये... अशी आठवण रेणुकाबाई गणवीर सांगतात..!बाबासाहेबांचं भाषण अन् दुधाची विक्रीरेणुकाबाई म्हणाल्या, यवतमाळात कवा बाबासाहेब आल्याचं माहीत नाई. पण येकडाव पुलगावले बाबासाहेबाचं रात्री भाषण झालं. यवतमाळातून लई लोक गेल्ते. माही शेजारी तेवरेबाई दुध विकाचा धंदा करे. थे जाऊन आल्ती. तेवरेबाई सांगे, बाबासाहेबाच्या भाषणामुळे भरमसाठ दूध खपलं थ्या रात्री. रातभर पाह्यलं बाबासाहेबाले आसं तेवरेबाई मले कितीतरी डाव अभिमानानं सांगे. आता तेवरेबाई मरणपावली. तिचं पोरगंबी आता म्हतारं झालं. जुना काळच अलग होता.

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती