भास्कर देवकते ।लोकमत न्यूज नेटवर्कबिटरगाव : येथील पोलीस वसाहतीतील निवासस्थानांची प्रचंड दुर्दशा झाली आहे. निवासस्थाने जीर्ण झाल्याने कुटुंबीयांचे जीवन धोक्यात आले आहे.बिटरगाव येथे ब्रिटिशांच्या काळात पोलीस ठाण्याची स्थापना झाली. त्यावेळी निवासस्थाने बांधली. त्यानंतर वेळोवेळी निवासस्थानांची डागडूजी झाली. सध्या ही निवासस्थाने जीर्णावस्थेत आहे. अनेक निवासस्थाने धोकादायक असून ते कधी पडतील याची शाश्वती नाही. काही घरे ओसाड पडली आहे. काहींमध्ये पोलीस कर्मचारी डागडुजी करून वास्तव्याला आहे.ही घरे दारे व खिडक्यांविना आहे. परिसरात घाणीचे साम्राज्य आहे. सांडपाण्यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे. पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन वास्तव्य करावे लागते. कवेलू, टीनपत्रे दयनीय आहे. ईलेक्ट्रीयक वायर उघडे पडल्याने धोका निर्माण झाला. रक्षण करणाऱ्यांवरच ही वेळ ओढवली आहे. परिसरातील ४५ गावांतील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी ३० कर्मचारी सांभाळतात. त्यांच्या घरांची दुरावस्था झाल्याने कुटुंबीयांचे संरक्षण धोक्यात सापडले आहे.नक्षलग्रस्त सुविधाच नाहीबिटरगाव पोलीस ठाणे नक्षलप्रभावीत क्षेत्रात आहे. जवळपास ४० गावे पैनगंगा अभयारण्यात येतात. काही वर्षांपूर्वी येथे नक्षलवादी सक्रिय होते. मात्र पोलीस ठाणे व वसाहतीला नक्षलग्रस्त सुविधा प्राप्त नाही. वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन किमान पोलीस वसाहतीची नवनिर्मिती करावी, अशी अपेक्षा आहे.
बिटरगावच्या पोलिसांची घरे मोडकळीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 11:57 PM
येथील पोलीस वसाहतीतील निवासस्थानांची प्रचंड दुर्दशा झाली आहे. निवासस्थाने जीर्ण झाल्याने कुटुंबीयांचे जीवन धोक्यात आले आहे. बिटरगाव येथे ब्रिटिशांच्या काळात पोलीस ठाण्याची स्थापना झाली.
ठळक मुद्देकुटुंबीय धोक्यात : दुरुस्तीकडे दुर्लक्ष, जीव मुठीत घेऊन करावे लागते वास्तव्य