शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
5
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
6
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
7
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

भाजप-सेनेचा रुग्णसेवा संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 10:28 PM

जिल्ह्यातील रूग्णसेवेचे पेटेंट शिवसेनेकडे आहे. त्यावरच घाव घालण्याचे काम भाजपाकडून केले जात आहे.

ठळक मुद्देतयारी विधानसभेची : नेत्यांमधील छुप्या अजेंड्याचा शिवसेनेला फटका

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : जिल्ह्यातील रूग्णसेवेचे पेटेंट शिवसेनेकडे आहे. त्यावरच घाव घालण्याचे काम भाजपाकडून केले जात आहे. यासाठी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन म्हणून डॉ. मनीष श्रीगीरीवारांकडे प्रभार सोपविण्यात आला. पुढील विधानसभेची निवडणूक डोळ््यासमोर ठेवून भाजपाची यवतमाळात आखणी सुरू आहे. यामुळे भाजपा-शिवसेनेत रूग्णसेवा संघर्ष पेटला आहे.यवतमाळ विधानसभा निवडणुकीत २०१४ मध्ये शिवसेनेच्या रुग्णसेवक उमदेवाराने भाजपा उमेदवार व विद्यमान मंत्री मदन येरावार यांना चांगलीच टक्कर दिली होती. हा धोका ओळखून भाजपा पुढील निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करीत आहे. त्यासाठी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अभ्यागत मंडळात शिवसेनेचा एकही प्रतिनिधी जाणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली. नंतर अभ्यागत मंडळ अध्यक्ष म्हणून आमदाराला नियुक्ती देण्यात आली. यातून आघाडी सरकारच्या काळातील खासदारांकडे अभ्यागत मंडळाचे अध्यक्षपद देण्याचा प्रघात मोडीत काढण्यात आला.रूग्णालयातील शिवसेनेचे प्रस्थ मोडीत काढण्यासाठी भाजपाने एका प्राध्यापकावर जबाबदारी सोपविली. त्याचे पद्धतशीर नियोजन केले जात आहे. काँग्रेसच्या काळात रुग्णसेवक म्हणून सेवा देणाºयालाही भाजपाने आपल्या पदरी ठेवत अभ्यागत मंडळात स्थान दिले. प्रशासन अनुकूल करण्यासाठी ज्येष्ठांना डावलून डीनचा प्रभार डॉ. श्रीगिरीवारांकडे सोपविला गेला. नंतर शिवसेनेचा बिमोड करण्यास सुरूवात झाली. सर्वप्रथम महाविद्यालयीन कँटीनवर आघात करण्यात आला. मातोश्री सभागृहावरील वर्दळ कमी करण्यासाठी अनेक दिवसांपासून पडीत पडलेल्या भाजपाच्या अतिथीगृहाचे काम युुद्धपातळीवर सुरू केले गेले. आता तेथे रूग्णांच्या नातेवाईकांसाठी पूर्णवेळ अन्नछत्र कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. तरीही शिवसेनेचे शिलेदार गप्प असल्याने शिवसैनिकांची गोची झाली आहे.पालकमंत्री आणि सहपालकमंत्री यांच्यातील छुप्या अजेंड्याप्रमाणे कुणी कुणाच्या मतदारसंघात लक्ष द्यायचे नाही, यावरून ही रणनीती आखली जात आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैैठकीतही सहपालकमंत्री अगदीच काही मिनिटांपुरते सहभागी होतात. त्यानंतरही त्यांच्या मतदारसंघातील कामे मार्गी लागतात. इतर भाजपा आमदारांना मात्र संघर्ष करावा लागतो, असे दिसून येत आहे.रुग्णालयात सकारात्मक बदलकाँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात शिवसेनेच्या रुग्णसेवेला कधी आव्हान मिळाले नाही. मात्र भाजपाने शिवसेनेचे रुग्णसेवा पेटेंट हिरावण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यामुळे नजीकच्या काळात भाजप-सेनेतील रुग्णसेवा संघर्ष अधिक पेटण्याची चिन्हे आहेत. ८० टक्के समाजकारणाच्या नावाने राजकारणच होते, हे सर्वश्रृत असले, तरी या संघर्षामुळे मात्र रुग्णालयातील अंतर्गत प्रशासनात सकारात्मक बदल होत आहे. हा बदल कायमस्वरूपी राहावा व राजकीय पक्षातील तथाकथित रुग्णसेवकांची मक्तेदारी संपुष्टात यावी, एवढीच माफक अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांना आहे.