शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
3
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
4
'गद्दारांना तुरुंगात टाकू'; सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
5
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
6
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
7
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
8
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
9
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना सवाल; "खरी शिवसेना कधीही..."
10
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
11
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
12
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
13
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
14
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
15
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
16
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
17
Video: तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
18
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
19
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद

भाजपातील निष्ठावान संतप्त

By admin | Published: February 08, 2017 12:26 AM

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये पक्षात नव्याने दाखल झालेल्या बहुतांश कार्यकर्त्यांनाच पक्षाने तिकीट

‘आयाराम’ ठरले वरचढ : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक संतोष कुंडकर  वणी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये पक्षात नव्याने दाखल झालेल्या बहुतांश कार्यकर्त्यांनाच पक्षाने तिकीट दिल्याने भाजपात अंतर्गत कलह माजला आहे. पक्षश्रेष्ठींच्या या धोरणामुळे निष्ठावान कार्यकर्ते चांगलेच दुखावले असून आम्ही काय आयुष्यभर सतरंज्याच उचलायच्या का, असा प्रश्न निष्ठावान कार्यकर्त्यांमधून विचारला जात आहे. वणी तालुक्यातील घोन्सा गणातून भाजपातर्फे निवडणूक लढविण्यासाठी नऊ जण उत्सूक होते. त्यात इंदिरा सहकारी सुतगिरणीचे संचालक सुनिल मत्ते, घोन्साचे उपसरपंच अनिल साळवे, कोरंबी मारेगाव येथील संघाचे निष्ठावान कार्यकर्ते प्रमोद कोसारकर, दहेगाव येथील नंदू उलमाले, रासा येथील मोहन वरारकर यांच्यासह नऊजण शर्यतीत होते. यातील काहींना तर कामाला लागा असा आदेशही देण्यात आला होता. मात्र ऐनवेळी २ जानेवारीला भाजपात प्रवेश करणाऱ्या घोन्सा येथील महेश उराडे यांना पक्षाने तिकीट दिल्याने घोन्सा गणातील निष्ठावान कार्यकर्ते चांगलेच संतापले आहेत. उराडे यांच्या नावाला घोन्सा गणातील कार्यकर्त्यांकडून प्रखर विरोध आहे. मात्र हा विरोध झुगारून उराडेंना तिकीट बहाल केल्याच्या मुद्यावरून सोमवारी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवारांच्या निवासस्थानी चांगलेच रणकंदन माजले होते, अशी माहिती आहे. उराडे यांनी आपल्या तिकीटासाठी नागपुरातून ‘फिल्डिंग’ लावली. तेथून दबाव आल्याने आ.बोदकुरवारांना उराडेंना उमेदवारी द्यावी लागली, असे सांगण्यात येते. दरम्यान, घोन्सा गणातून भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढविण्यासाठी ईच्छूक होते, त्या नऊजणांपैैकी सात जणांची मंगळवारी गुप्त बैैठक झाली. या बैैठकीत काय निर्णय झाला, त्याचा तपशिल मात्र मिळू शकला नाही. राजुर-चिखलगाव गटातही हाच प्रकार झाला. या गटातून भाजपातर्फे बाळा हिकरे व शंकर बोरगलवार हे उमेदवारीसाठी दावेदार होते. बाळा हिकरे यांची तिकीट फायनल झाली होती. मात्र अगदी नामांकन अर्ज दाखल करताना बाळा हिकरे यांच्या अर्जाला लावून असलेला पक्षाचा बी फॉर्म काढून तो संघदीप भगत यांच्या नामांकन अर्जाला जोडण्यात आला. संघदीप भगत हे राजूर (कॉलरी) ग्रामपंचायतीचे सदस्य असून त्यांनी बसपाच्या तिकीटावर ग्रामपंचायत निवडणूक लढविली होती. राजूर-चिखलगाव गटातील कार्यकर्तेही चांगलेच दुखावले आहेत. त्यातच बाळा हिकरे यांनीही अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने या गटातील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मारेगाव व झरी जामणी तालुक्यातही अनेक गट व गणात असाच प्रकार झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे आता निवडणुकीत हे असंतुष्ट कार्यकर्ते काय भूमिका घेतात, याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.