शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
5
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
6
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
7
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

यवतमाळात भाजपा पदाधिकाऱ्याचा आरटीओ चौकात खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 11:09 AM

येथील भाजपाच्या दलित आघाडी जिल्हा उपाध्यक्षाचा सावकारीच्या पैशाच्या वादातून निर्घृण खून करण्यात आला. ही खळबळजनक घटना गुरुवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास नागपूर रोड स्थित आरटीओ कार्यालयाच्या समोर घडली.

ठळक मुद्देसावकारीच्या पैशाचा वाद दोन्ही मारेकऱ्यांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील भाजपाच्या दलित आघाडी जिल्हा उपाध्यक्षाचा सावकारीच्या पैशाच्या वादातून निर्घृण खून करण्यात आला. ही खळबळजनक घटना गुरुवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास नागपूर रोड स्थित आरटीओ कार्यालयाच्या समोर घडली. यातील मृतकाला यापूर्वी एका खुनाच्या घटनेत जन्मठेपेची शिक्षाही ठोठावण्यात आली आहे, हे विशेष. खुनाच्या या घटनेमुळे यवतमाळातील वाढती गुन्हेगारी पुन्हा एकदा चर्चेत आली.रितेश उर्फ बल्ली विलास बावीस्कर (२५) रा. पाटीपुरा यवतमाळ असे यातील मृताचे नाव आहे. त्याची आई फुलाबाई बावीस्कर यांनी दिलेल्या तक्रारीवरून यवतमाळ शहर पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदविला. घटनेनंतर अवघ्या दोन तासात पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने दोन्ही आरोपींना स्मशानभूमी परिसरातील इंदिरानगरातून अटक केली. नईम उर्फ टमाटर खान वल्द गुलाबनबी खान (३२) रा. अलकबीरनगर यवतमाळ व नंदलाल उर्फ बंटी लाला दयाप्रसाद जयस्वाल (२९) रा. विदर्भ हाऊसिंग सोसायटी यवतमाळ अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रितेश उर्फ बल्ली याने आरोपीला व्याजाने पैसे दिले होते. या पैशासाठी तो सतत तगादा लावत होता. याच कारणावरून रात्री त्यांच्यात भांडण झाले. या भांडणाचा वचपा म्हणून रितेशच्या खुनाचा कट रचण्यात आला. रात्री ठरल्याप्रमाणे सकाळी त्याला आरटीओ कार्यालय परिसरात बोलविण्यात आले. तेथे येताच त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला गेला. जीव वाचविण्यासाठी तो गोदामाच्या परिसरात आश्रयाला गेला असता तेथेही त्याच्यावर सशस्त्र हल्ला करण्यात आला. यात रितेश मृत्यूमुखी पडला. घटनेनंतर मारेकरी तेथून पसार झाले. त्यांना स्मशानभूमी परिसरातील इंदिरानगरातून अटक करण्यात आली.रितेशकडून आरोपींनी ३० हजार रुपये उधार घेतले होते. त्यापेक्षा किती तरी रक्कम व्याजासह परत केली. मात्र आणखी पैशाचा तगादा रितेशकडून सुरू होता. शिवीगाळ, धमकी देणे असे प्रकारही केले जात होते. त्याच्याकडून पैशासाठी जीवाला धोका होण्याची भीती असल्याने आरोपींनी स्वत:च रितेशचा खून करण्याचा प्लॅन बनविला व तो अमलात आणल्याची माहिती पोलिसांनी दिली.पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्या विशेष पथकातील सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत गिते, जमादार अजय डोळे, सय्यद साजीद, पोलीस कर्मचारी वासू साटोणे, प्रदीप नायकवाडे, योगेश डगवार, रुपेश पाली, चालक अजय ढोले आदींनी आरोपींच्या अटकेची कारवाई केली.

टॅग्स :Murderखूनcrimeगुन्हे