शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
2
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
3
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : शरद पवार यांनी बजावला मतदानाचा अधिकार; म्हणाले...
5
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
6
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
7
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
8
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
9
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
10
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
11
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
12
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन
13
Vishal Mega Mart IPO: केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
14
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
15
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
16
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
17
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
18
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
19
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!

दारव्हा येथे भाजपाचा मेळावा

By admin | Published: January 21, 2017 1:28 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लोकाभिमुख निर्णय, जनविकासाच्या ध्यासामुळे,

दारव्हा : पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लोकाभिमुख निर्णय, जनविकासाच्या ध्यासामुळे, येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीला कार्यकर्त्यांनी आत्मविश्वासाने सामोरे जावे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. ते दारव्हा येथे शुक्रवारी आयोजित भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. ते पुढे म्हणाले, प्रामाणिक माणूसच कठोर निर्णय घेऊ शकतो. त्यानुसार मोदी यांनी नोटबंदीचा कठोर निर्णय घेतल्याने देशात दडलेला काळा पैसा बाहेर आला. हा पैसा विकास कामांवर खर्च केला जाणार आहे. केंद्र व राज्य सरकारने जनतेच्या हिताच्या अनेक योजना सुरू केल्या. त्या जनतेपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांवर आहे. निवडणुकीसाठी आपले लक्ष स्पष्ट असून त्याला मेहनतीची जोड दिल्यास जिल्हा परिषद व पंचायत समितीत सत्ता असेल, असे त्यांनी सांगितले. पक्षाचा केवळ जाहिरनामा नसून तो वचननामा आहे. कार्यकर्त्यांनी जनतेशी नम्रपणे वागून गल्लीतील राजकारणाची गुंज आता दिल्लीत पोहोचवावी, असे आवाहन त्यांनी केले. या मेळाव्यात माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष चव्हाण यांनी कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश घेतला. मंचावर जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, माजी आमदार उत्तमराव इंगळे, तालुकाध्यक्ष दत्तात्रय राहणे, माजी सभापती नीलेश भारती, नगरपरिषद उपाध्यक्ष प्रिती राहुल बलखंडे, डॉ. दिलीप जामनकर, धनंजय बलखंडे, सचिन जाधव, रवी अस्वार, मधुसूदन लोहकरे, नाना सावळे, नगरसेवक दामोदर लढ्ढा, शुभम गवई, सुनिता ठाकरे, मिरा कराळे, यादव पवार, पंजाब जाधव, सुभाष दायमा, गजानन गुल्हाने, घनश्याम वानखडे उपस्थित होते.( तालुकाप्रतिनिधी)