शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
3
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
4
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
6
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
7
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
8
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
9
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
10
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
11
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
12
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
13
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
14
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
15
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
16
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
17
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
18
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
19
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
20
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...

वणी तालुक्यात भाजपा-सेनेचा वरचष्मा

By admin | Published: February 24, 2017 2:36 AM

जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुकीत तालुक्यातील भाजपा-शिवसेनेचा वरचष्मा राहिला आहे,

काँग्रेसचा सफाया : तीन गटात भाजपाची मुसंडी, एक गट शिवसेनेच्या ताब्यात, कार्यकर्त्यांचा जल्लोषसंतोष कुंडकर/ विनोद ताजने वणीजिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुकीत तालुक्यातील भाजपा-शिवसेनेचा वरचष्मा राहिला आहे, तर काँग्रेसला एकही जागा न मिळाल्याने तालुक्यातून काँग्रेसचा सफाया झाला. जिल्हा परिषदेच्या चार जागांपैकी तीन जागा भाजपाला, तर एक जागा शिवसेनेला मिळाली. मागील वेळेपक्षा भाजपाला दोन जागेचा फायदा, तर सेनेला एका जागेचे नुकसान झाले. पंचायत समिती गणात आठ जागांपैकी चार जागा भाजपाला, तीन शिवसेनेला तर एक जागा भाकपाला मिळाली. त्यामुळे पंचायत समिती सभापतीची चाबी आता भाकपकडे आली आहे.येथील शासकीय गोदामात गुरूवारी सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरूवात झाली. दुपारी १२.३० वाजता सर्व निकाल हाती आलेत. जिल्हा परिषदेच्या गटांमध्ये शिरपूर-शिंदोला गटातून शिवसेनेचे परसाराम पेंदोर यांनी भाजपाच्या राजू सांबशिव गेडाम यांचा १५७६ मतांनी पराभव केला. घोन्सा-कायर गटात भाजपाच्या मंगला पावडे यांनी काँग्रेसच्या वंदना आवारी यांचा १६१६ मतांनी पराभव केला. चिखलगाव-राजूर गटात भाजपाचे संघदीप भगत यांनी काँग्रेसचे डॅनी सँड्रावार यांचा ८६८ मतांनी पराभव केला, तर लालगुडा-लाठी गटात भाजपाचे बंडू चांदेकर यांचा केवळ ५१९ मतांनी विजय झाला. शिवसेनेचे डॉ.गजानन मेश्राम हे अखेरच्या तीन मतयंत्रात माघारले. त्यामुळे त्यांना पराभव पत्करावा लागला. राष्ट्रवादीने या गटात एकमेव जागा लढविली होती. राष्ट्रवादीचे उमेदवार स्वप्नील धुर्वे यांना केवळ ५१७ मते मिळाली. पंचायत समितीच्या गटात कायर, घोन्सा, राजूर, चिखलगाव हे चार गणात भाजपाने बाजी मारली. लाठी, शिरपूर व शिंदोला गण शिवसेनेच्या ताब्यात गेले, तर लालगुडा गणात भाकपच्या चंद्रज्योती शेंडे यांचा केवळ ५० मतांनी विजय झाला. चिखलगाव गणात भाजपाचे संजय पिंपळशेंडे यांचा ७९५ मतांनी विजय झाला. काँग्रेसचे अमोल रांगणकर दुसऱ्या स्थानावर, तर शिवसेनेचे तेजराज बोढे तिसऱ्या स्थानावर राहिले. राजूर गणात भाजपाच्या शिला कोडापे यांनी अपक्ष उमेदवार विद्या पेरकावार यांचा ७०८ मतांनी पराभव केला. सर्वांचे लक्ष लागून असलेल्या लाठी गणात भाजपाच्या उमा पिदुरकर यांचा ४७९ मतांनी पराभव झाला. येथे शिवसेनेचे टिकाराम खाडे हे वियजी झाले. शिरपूर गणातून शिवसेनेच्या वर्षा मोरोपंत पोतराजे त्यांनी काँग्रेसच्या प्रतिभा येरगुडे यांचा २५३ मतांनी पराभव केला. घोन्सा गणात भाजपाच्या महेश उराडे यांनी शिवसेनेच्या प्रदीप निखाडे यांचा १०७३ मतांनी पराभव केला. कायर गणात भाजपाच्या लिशा गजानन विधाते यांनी सेनेच्या रजनी टोंगे यांचा ७४४ मतांनी पराभव केला. शिंदोला गणाकडेही जनतेचे लक्ष लागले होते. या गणातून शिवसेनेचे संजय निखाडे यांनी भाजपाचे शांतीलाल जैन यांचा १०६७ मतांनी पराभव केला. वणी येथील शासकीय गोडाऊनमध्ये मतमोजणी पार पडली. यावेळी पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. निकाल ऐकण्यासाठी टिळक चौैक व तहसील परिसरात ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.