लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : देशात ८ नोव्हेंबर २०१६ रोजी केंद्र शासनाने अचानक निर्णय घेवून पाचशे व हजाराची नोट चलनातून बाद केली. हा निर्णय देशासाठी घातक ठरल्याचा आरोप करून या निर्णयाला आज एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त राळेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने काळा दिन पाळण्यात आला आणि तहसीलदारांना निवेदन दिले.काँग्रेस कमिटीच्यावतीने निवेदनातून शासनाला विविध प्रश्न विचारण्यात आले आहे. नोटा बदलविण्यासाठी चार महिने नागरिकांना रांगेत उभे राहावे लागले. त्यामध्ये अनेकजण मृत्युमुखी पडले. लहान-मोठे व्यापारी, शेतकरी, शेतमजुरांना आपली कामे टाकून बँकेत दिवसभर ताटकळत उभे राहावे लागले. त्यावेळी पंतप्रधानांनी दावा केल्यानुसार काळा पैसा बाहेर येणार, तो अद्यापही आला नाही.म्हणजे तो कुठे गायब झाला, असा प्रश्न निवेदनातून विचारण्यात आला आहे. यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद फुटाणे, प्रवीण कोकाटे आदींसह अनेकांची उपस्थिती होती.
राळेगाव तालुका काँग्रेस कमिटीकडून काळा दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 11:12 PM
देशात ८ नोव्हेंबर २०१६ रोजी केंद्र शासनाने अचानक निर्णय घेवून पाचशे व हजाराची नोट चलनातून बाद केली.
ठळक मुद्देदेशात ८ नोव्हेंबर २०१६ रोजी केंद्र शासनाने अचानक निर्णय घेवून पाचशे व हजाराची नोट चलनातून बाद केली.