शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
2
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंची जाहीरच करून टाकलं
3
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
4
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
5
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
6
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
7
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
8
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
9
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
10
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
11
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
12
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
13
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
14
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
15
Gautam Adani News : अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
16
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
17
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
18
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
19
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
20
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही

कामचुकार कंत्राटदार पालिकेत ‘ब्लॅक लिस्टेड’

By admin | Published: June 29, 2017 12:11 AM

शहरातील झोन क्र.१ व २ मध्ये काम करणाऱ्या कंत्राटदाराकडून मागील काही दिवसांपासून स्वच्छतेचे काम पूर्णत: बंद करण्यात आले.

सर्वसाधारण सभा : एकाच कंत्राटदारावर संपूर्ण शहर स्वच्छतेची जबाबदारी लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : शहरातील झोन क्र.१ व २ मध्ये काम करणाऱ्या कंत्राटदाराकडून मागील काही दिवसांपासून स्वच्छतेचे काम पूर्णत: बंद करण्यात आले. त्यामुळे शहरातील या भागात घाण पसरली होती. काम न करणाऱ्या कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करून त्याला काळ्या यादीत टाकण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा नगरपरिषदेत घेण्यात आली. या सभेत काळ्या यादीत टाकण्याचा ठराव घेवून संपूर्ण शहराचे काम दुसऱ्या संस्थेच्या ठेकेदाराला देण्याचे ठरले. गाडगे महाराज स्वच्छता व स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था सफाईचे काम करत नसल्याने अनेक प्रभागांमध्ये कचरा साचला आहे. प्रभागात सफाई कामगार येत नसल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर मोठी समस्या निर्माण झाली. याबाबत नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार करून विशेष सभेची मागणी केली. या सभेत सर्वानुमते गाडगे महाराज संस्थेला काळ्या यादीत टाकण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतर पुढील निविदा प्रक्रिया होईपर्यंत झोन तीन व चारमध्ये काम करणाऱ्या कंत्राटदाराकडे तात्पुरती जबाबदारी सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला. शहर स्वच्छतेसाठी वाढीव क्षेत्रासह संपूर्ण भागाकरिता तातडीने निविदा प्रक्रिया राबवून परिपूर्ण कंत्राट देण्याचाही ठराव सभेत घेण्यात आला. त्यानंतर शहरातील हागणदारीमुक्त करण्यासाठी जवाईनगर तलावफैल, राजारामनगरचे खुले मैदान, नेताजीनगर परिसरात सार्वजनिक शौचालय बांधण्याचा ठराव चर्चेसाठी आला. तसेच यवतमाळ शहर हागणदारीमुक्तची घोषणा करण्याचा प्रस्तावही यावेळी ठेवण्यात आला. यावर सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी आक्षेप घेतला. मुळात वैयक्तिक शौचालय योजनेतील अनेक लाभार्थ्यांना वेळेत मोबदला न मिळाल्याने शौचालयाचे काम रखडल्याचे सदस्यांनी सांगितले. पालिका चुकीच्या लाभार्थ्यांना लाभ देत असल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. वैयक्तिक शौचालय योजना परिपूर्णरित्या राबविल्याशिवाय पालिकेने शहर हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा करू नये, असा आक्षेप नगरसेवकांनी नोंदविला. स्वच्छतेच्या कामकाजावरून वाढीव क्षेत्रातील नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेवून मागील सहा महिन्यात केवळ नगरपालिका प्रशासन या भागातून कर वसुली करण्याचे काम करत आहे. येथे कुठलीही सोयीसुविधा पुरविली जात नाही. पुर्वीचे ग्रामपंचायतीचे कर्मचारी पालिकेने कार्यालयीन कामकाजात लावल्याने गैरसोय होत असल्याचे नगरसेवकांनी सांगितले. याबाबत वाढीव क्षेत्रातील नगरसेवकांची स्वतंत्र बैठक सायंकाळी ४ वाजता आयोजित करण्याचे ठरले. वॉर्डातील कर्मचाऱ्यांवरून काही नगरसेवकांमध्ये सभेतच तू-तू-मै-मै झाली. सभा सुरू असतानाच काही महिला निवेदन घेवून आल्या. मात्र सभेची गरिमा ठेवा, अशा प्रकारे कामकाज चालत नाही, असा सूर काही नगरसेवकांनी आवळला. इतकेच नव्हे तर सभा सुरू असताना मोठ्या प्रमाणात गर्दी होती. स्वच्छतेच्या मुद्यावर सर्वच सदस्यांनी अतिशय आक्रमक भूमिका मांडली. पालिकेच्या प्रशासनात प्रचंड अनागोंदी असल्याने सर्वांनीच संताप व्यक्त केला.