शहरं
Join us  
Trending Stories
1
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
2
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
3
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
4
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
5
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर
6
देश सोडला, भारतात आली, ओळख लपवली...; एडल्ट स्टार बन्ना शेख कशी बनली रिया बर्डे?
7
'डॉली चायवाला'ची क्रेझ! भारताच्या हॉकी संघाकडे केलं दुर्लक्ष; खेळाडूंनी व्यक्त केली खदखद
8
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका
9
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
10
अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम?
11
Musheer Khan Accident: टीम इंडियाचा क्रिकेटर सर्फराज खानचा भाऊ मुशीरचा अपघात
12
Solar Eclipse 2024: सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही पण परिणाम होतो हे नक्की; जाणून घ्या उपाय!
13
पितृपक्ष: चतुर्दशी श्राद्ध एवढे महत्त्वाचे का? केवळ ‘या’ पितरांचा करतात विधी; पाहा, मान्यता
14
काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक; 3 जवान जखमी, सर्च ऑपरेशन सुरू
15
Indira Ekadashi 2024: नोकरी व्यवसायात यशप्राप्तीसाठी आज इंदिरा एकादशीला करा 'हे' खास उपाय!
16
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
17
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
18
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
19
अदानींच्या झोळीत आली आणखी एक कंपनी; २०० कोटींना झाली डील, जाणून घ्या
20
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...

ऑनलाइन पीयूसीचा आरटीओ कार्यालयासमोरच काळाबाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2022 10:02 PM

मोठ्या विश्वासाने केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रणालीचे लोकार्पण केले. प्रत्यक्षात मात्र पूर्वीच्या पीयूसी प्रमाणपत्र प्रक्रियेपेक्षाही अधिकचा भ्रष्टाचार ऑनलाईन प्रणालीत बोकाळला आहे. वाहन नसतानाही केवळ फोटोचा वापर करून ऑनलाईन पीयूसी प्रमाणपत्र दिले जात आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे हा सर्व गैरप्रकार आरटीओ कार्यालयासमोरच घडत आहे. ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून ही बाब उघड झाली. 

सुरेंद्र राऊतलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहनाची पीयूसी तपासण्याची प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली. यासाठी ठराविक असे सॉफ्टवेअर तयार केले गेले. मोठ्या विश्वासाने केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रणालीचे लोकार्पण केले. प्रत्यक्षात मात्र पूर्वीच्या पीयूसी प्रमाणपत्र प्रक्रियेपेक्षाही अधिकचा भ्रष्टाचार ऑनलाईन प्रणालीत बोकाळला आहे. वाहन नसतानाही केवळ फोटोचा वापर करून ऑनलाईन पीयूसी प्रमाणपत्र दिले जात आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे हा सर्व गैरप्रकार आरटीओ कार्यालयासमोरच घडत आहे. ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून ही बाब उघड झाली. डिझेल, पेट्रोल वाहनातून निघणारा धूर त्यात असणारे कार्बन मोनॉक्ससाईडचे प्रमाण यासाठी काही निकष ठरविण्यात आले आहे. पीयूसी प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाते. इतकेच नव्हे तर आरटीओ कार्यालयात फिटनेससाठी आलेल्या वाहनाचे सर्वांत प्रथम पीयूसी प्रमाणपत्र तपासण्यात येते. पीयूसी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया पारदर्शक व भ्रष्टाचार विरहित व्हावी यासाठी ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आली. ठराविक सॉफ्टवेअर तयार करून पीयूसी प्रमाणपत्र देण्याचे सेंटर सार्वजनिक केले आहे. हे सर्व सेंटर आरटीओच्या अधिन कार्यरत आहेत. पीयूसीचा काळाबाजार पांढरकवडा, वणी इतकेच नव्हे तर यवतमाळ शहरातील काही केंद्रांवर कमी अधिक प्रमाणात सुरू आहे. 

पीयूसी तपासणीची प्रक्रिया - या पीयूसी सेंटरवर वाहनाची प्रत्यक्ष तपासणी करणे आवश्यक आहे. वाहन पीयूसी सेंटरवर आल्यानंतर तेथे किमान १५ मिनीट वाहन फूल रेसवर ठेवावे लागते. सायलेन्सरमध्ये पीयूसी तपासणी यंत्राचे नोझल टाकून वाहनातून निघणारा धूर कसा आहे, त्यावरून या वाहनाद्वारे हवेत किती प्रदूषण होते याची तपासणी केली जाते. त्यानंतर ऑनलाईन प्रणालीने ही सर्व प्रक्रिया करून प्रमाणपत्र दिले जाते. - या प्रमाणपत्रासाठी शासनाने दर निश्चित केेले आहे. प्रत्यक्षात मात्र अशी तपासणीच होत नाही. वाहनाचा फोटो घेऊन शासकीय दरापेक्षा शंभर रुपये अधिक घेत पीयूसी प्रमाणपत्र दिले जाते. बरेचदा वाहन चालकाकडून अतिरिक्त रक्कम वसूल केली जाते. ऑनलाईन पावतीवर सोईस्करपणे खरे शुल्क दिसणार नाही, अशा प्रकारे शिक्का मारला जातो व पैसे वसूल केले जातात. एक प्रकारे वाहनधारकांची लूट सुरू आहे. तर दुसरीकडे प्रदूषण फैलवणाऱ्या वाहनांना बोगस पीयूसीद्वारे खुली सूट मिळाली आहे. 

 असे आहेत पीयूसीचे शासकीय दर - दुचाकी वाहन - ५० रुपये- पेट्रोलवरील तीनचाकी वाहन - १०० रुपये- पेट्रोल, सीएनजी, एलपीजीवर चालणारे चारचाकी वाहन - १२५ रुपये- डिझेलवर चालणारी सर्व  वाहने - १५० रुपये - प्रत्यक्ष १०० ते १५० अधिकचे घेतले जाते.

यासंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित पीयूसी केंद्रावर कारवाई केली जाईल. हा प्रकार गंभीर असून अशा प्रकारचे प्रमाणपत्र देणाऱ्यांचे पीयूसी केंद्र रद्दचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात येईल. - ज्ञानेश्वर हिरडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस