ऑनलाईन लोकमतघाटंजी/पारवा : तालुक्यातील आदिवासी बांधवांवर पोलीस प्रशासनाकडून होत असलेल्या अन्याच्या निषेधार्थ मंगळवारी गोंडवाना संग्राम परिषदेतर्फे शहरातील चारही मुख्य रस्त्यावर नाकाबंदी करण्यात आली. पारवा चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.कुर्ली येथील शोभा आनंदराव मेश्राम या महिलेच्या निर्घृण खूनाची चौकशी करावी, येळाबारा येथील सुनील आत्राम याच्या नियोजनबद्ध खुनाची चौकशी व्हावी, आश्रमशाळेतील राजश्री कोटनाके हिच्या हत्याकांडाची चौकशी करावी, या प्रमुख मागण्यांसाठी नाकाबंदी व रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पोलीस प्रशासन आदिवासी मतदारसंघात आदिवासींवरच अन्याय करीत असल्याचा आरोप गोंडवाना संग्राम परिषदेने केला. या सर्व घटनेतील आरोपींना अटक करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच पीडित कुटुंबाला प्रत्येकी ३० लाख रुपयांची मदत देण्याची मागणी करण्यात आली. मंगळवारी सकाळी ८ वाजतापासून मानोली नाका, पारवा-शिवणी चौफुली, यवतमाळ नाका, पांढुर्णा-कुंभारी चौफुली येथे आदिवासी बांधवांनी नाकाबंदी केली. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना स्थानबद्ध केले. नंतर त्यांना सोडण्यात आले.यावेळी डॉ.निरंजन मसराम, बळवंत मडावी, श्रीराम तलांडे, मोतीरावन कनाके, तुळशीराम आत्राम, मारोती कनाके, माणिक मेश्राम, मनोज मेश्राम, अमृत पेंदोर, शैलेश चांदेकर, मनीषा आत्राम, पारवा येथे नत्थुजी वेट्टी, संदीप मरस्कोल्हे, ज्योतीराम कुळसंगे, संजय गेडाम, बापुराव कोवे, रवींद्र आत्राम, नीलेश कोवे, सारंग आडे आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.चिखलवर्धा येथे शम्मीभाई लक्ष्मण केळझर, कृष्णा मेश्राम, संजय बेरकाडे, संभू पेंदोर, हरदास घोडाम आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.
घाटंजीत चारही मुख्य रस्त्यांवर नाकाबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 11:37 PM
तालुक्यातील आदिवासी बांधवांवर पोलीस प्रशासनाकडून होत असलेल्या अन्याच्या निषेधार्थ मंगळवारी गोंडवाना संग्राम परिषदेतर्फे शहरातील चारही मुख्य रस्त्यावर नाकाबंदी करण्यात आली.
ठळक मुद्देपारवा चौफुलीवर रास्ता रोको : आरोपींवर कारवाईची मागणी